आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beti Bachao, Beti Padho Launched In Additional 61 Districts

देशात ४९ जिल्ह्यांत मुलींच्या जन्मदरात लक्षणीय वाढ, मनेका गांधी यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुलींच्या जन्मदरात वाढ झाल्याची चांगली बातमी आहे. देशातील १०० जिल्ह्यांपैकी ४९ जिल्ह्यांत ही वाढ झाली आहे. सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘बेटी बचाआे, बेटी पढाआे ’ मोहिमेला चांगले यश आल्याची ही पावती आहे, असे महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी म्हटले आहे.

बेटी बचाआे, बेटी पढाआे मोहिमेला देशातील आणखी ६१ जिल्ह्यांतून राबवण्यास सुरुवात झाली आहे. त्या निमित्त आयोजित कार्यक्रमात मनेका यांनी ही माहिती दिली. गरोदर मातांची नावनोंदणी अनिवार्य करणे गरजेचे आहे. गावातील पंचायतीमध्ये त्याची नोंद व्हायला हवी. सरपंचांनी या बाबत एका अधिकाऱ्याची नेमणूक केली पाहिजे. दरवर्षी लिंगगुणोत्तरासंबंधीचा किमान दर १० असा निश्चित करणे गरजेचे आहे. दरवर्षी हे प्रमाण १० टक्के राखणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. पाच वर्षांत हा दर ५० वर पाेहोचू शकेल. अशा प्रकारे जन्मदर राखण्यात यश आल्यास प्रत्येकी १ हजार मुलांमागे मुलींची संख्याही वाढेल. देशात अजूनही १०० टक्के प्रसूती रुग्णालयात होत नाहीत. काही टक्के अद्यापही घरगुती पातळीवर केल्या जातात. हे प्रकार थांबले पाहिजेत. त्यानंतर मुलींचा जन्मदर वाढवता येऊ शकेल. दरम्यान, बेटी बचाआे मोहीम देशातील १०० जिल्ह्यांतून यशस्वीरीत्या राबवण्यात आली आहे.
वेबवर माहिती द्या
बेकायदा लिंग तपासणीच्या घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अल्ट्रासाऊंड यंत्रांची माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून जाहीर केली पाहिजे. हरियाणात भीषण परिस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली पाहिजे, अशी सूचना मनेका यांनी केली आहे.