नवी दिल्ली - सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सध्या व्हिडिओ शेअरिंग वेबसाइट यू-ट्यूबवर एका महिलेचा डान्स व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत सव्वाकोटी लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हरियाणातील एका प्रसिद्ध गाण्यावर नवविवाहिता अशी काही थिरकली की तिथे उपस्थित तरुणीही पाहातच राहिल्या. एवढेच नाही तर, हरियाणाची प्रोफेशनल डान्सर आणि सिंगर सपना चौधरीच्या व्हिडिओंनाही या व्हिडोओने टक्कर दिली असल्याची चर्चा आहे.
नाचतानाही रितीरिवाज मोडले नाही...
- भारतात प्रत्येक समाजात लग्न आणि त्यानंतरच्या विविध प्रथा-परंपरा आहेत. काही ठिकाणी नव्या नवरीच्या स्वागतात संगीत आणि नृत्याचे आयोजन केले जाते. यावेळी इतर महिलाही ठेका धरतात.
- शक्यता आहे की या व्हिडिओमध्ये डान्स करणारी महिला देखील नवी नवरी आहे. सासरच्या इतर महिला व तरुणी 'भाभी'चा डान्स पाहात आहे. 'दिव्यमराठी डॉट कॉम'ने याची पडताळणी केलेली नाही.
- विशेष म्हणजे या संपूर्ण व्हिडिओमध्ये नवविवाहितेने कुठेही रिती-रिवाज आणि प्रथा, परंपरेला तडा जाऊ दिला नाही. डोक्यावरील घुंघट जरा देखील सरकू दिलेला नाही.
कोट्यवधी लोकांनी पाहिला व्हिडिओ
- हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
- विशेष म्हणजे यू-ट्यूबवर या व्हिडिओला 1 कोटी 30 लाख 14 हजार पेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहे.