आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहीद भगतसिंग यांचे हरवलेले पत्र 83 वर्षांनंतर प्रकाशात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशासाठी प्राणांची आहुती देणारे शहीद - ए - आझम भगतसिंग यांनी लिहिलेले परंतु कालौघात हरवलेले एक पत्र 83 वर्र्षांनंतर उजेडात आले आहे. यात भगतसिंग यांनी त्यांचे क्रांतिकारक सहकारी हरिकिशन तलवार खटल्यात पत्राद्वारे वकिलाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला होता.

भगतसिंग यांच्या जीवनावर अनेक पुस्तके लिहिणारे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्रोफेसर चमन लाल यांनी सांगितले की भगतसिंगांचे हे पत्र 83 वष्रे जुने आहे. हरिकिशनने 23 डिसेंबर 1930 मध्ये लाहोर विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरवर गोळीबार करून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हल्ल्यात गव्हर्नर बचावले होते व एक पोलिस निरीक्षकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी हरिकिशनवर ब्रिटिश सरकारने खटला भरला होता. चमनलाल यांनी सांगितले की हरिकिशन तलवार खटला प्रकरणात भगत यांनी पत्र लिहून वकिलाच्या भूमिकेवर नाराजी आक्षेप घेतले होते. त्यांचे ते पत्र हरवले होते. त्यानंतर भगतसिंगांनी दुसरे पत्र लिहिले. त्यात त्यांनी म्हटले होते की पहिले पत्र हरवल्यामुळे हे दुसरे पत्र लिहावे लागत आहे. खटल्यात हरिकिशन यांचा गव्हर्नरला मारण्याचा उद्देश नव्हता असे वकिलाने म्हटले होते. परंतु भगतसिंग पत्रात म्हणतात की साथी हरिकिशन हे एक बहाद्दूर योद्धा आहेत व त्यांच्याबाबत वकील महोदय वरील विधान करून त्यांचा अपमान करत आहेत. गव्हर्नरला मारणे हाच त्यांचा उद्देश होता.