आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता भगवद‌्गीता वाचून व्हा योगाचे सहायक प्राध्यापक!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आत्मिक शांती आणि सांसारिक जीवनापासून मुक्तीचा मार्ग दाखवणारे ग्रंथ म्हणून पाहिल्या जाणारी भगवद‌्गीता आणि उपनिषदे वाचून महाविद्यालये - विद्यापीठात आता सहायक प्राध्यापक होता येऊ शकणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) राष्ट्रीय पात्रता चाचणीसाठी (नेट) तयार केलेल्या योगा विषयाच्या अभ्यासक्रमात भगवद‌्गीता व वेदांतील काही भागाचा समावेश केला आहे. जानेवारी २०१७ मध्ये होणाऱ्या नेट परीक्षेत योगाचा १०० वा विषय म्हणून समावेश केला आहे.
यूजी आणि पीजी स्तरावर योगाचा अभ्यासक्रम सुरू केला आहे मात्र शिकवण्यासाठी शिक्षकांची उणीव आहे. नेटमध्ये योगाचा समावेश नसल्याने या विषयासाठी सहायक प्राध्यापकांच्या नियुक्त्याही करता येत नव्हत्या. त्यामुळे यूजीसीने बुधवारी योगा विषयाचा अभ्यासक्रम जारी केला आहे.
नेटचा हा १०० वा विषय असेल. नेटच्या योगाच्या अभ्यासक्रमात १० मुद्दे समाविष्ट झाले आहेत. त्यात योगाच्या सर्व वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. मोदी सरकार आल्यानंतर स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापण्यात आले. त्यानंतर योगासह पारंपरिक भारतीय विषयांचा अभ्यासक्रमांत समावेश करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...