आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘काेसला’कार ज्ञानपीठ झाले!, मोदी म्हणाले, अध्ययन रक्तातच असावे लागते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ज्येष्ठ साहित्यिक "कोसला'कार भालचंद्र नेमाडे यांना शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१४ वर्षाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. वाचनाचा गुणधर्म हा अानुवांशिकतेतूनच यायला पाहिजे तेव्हाच कुठे अाम्ही येणाऱ्या उद्यास अाेळखू शकू. डाॅ. भालचंद्र नेमाडे यांच्या रक्तामध्ये अध्ययन ठासून भरले अाहे. त्यांनी प्रसृत केलेले साहित्य हे पिढ्यान् पिढ्या मानवी जीवनास स्पर्श करणारे ठरेल, असे गाैरवाेद्गार पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी नेमाडे यांना सुवर्ण जयंती ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मािनत करताना काढले.
मराठीतील सुप्रसिद्ध लेखक व मर्मग्राही समीक्षक डॉ. भालचंद्र नेमाडे यांना पंतप्रधानांच्या हस्ते भारतीय साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मानपत्र, सरस्वतीची प्रतिमा, शाल, श्रीफळ व ११ लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप हाेते.
संसद ग्रंथालयाच्या बालयोगी सभागृहात भारतीय ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने आयोजित समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध लेखक नामवर सिंह, संस्थेचे संचालक लीलाधर मंडलोई, संस्थेच्या आजीव सदस्या तथा लेखिका त्रिशला जैन, सदस्य साहू अखिलेश जैन उपस्थित होते.

मोदी म्हणाले, अाम्ही लहान असताना ज्ञानपीठ पुरस्कार काेणाला मिळाला याची खूप चर्चा व्हायची. अाता पुरस्कार विजेते नेमांडेंच्या शेजारी बसण्याचा याेग अाला. नेमाडेंचे साहित्य अरविंद यांच्या ताेडीचे अाणि समांतर अाहे. या दाेघांचीही उंची खूप माेठी अाहे. त्यांचे सािहत्य निर्मिती ही अनुभूतीची अभिव्यक्ती हाेणारी असल्याने त्याची उपयुक्तता कायम राहील.
अलिकडे गुगलचा जमाना अाहे. तुम्हाला काही सेकंदात गुगल गुरु माहिती देईल परंतु ते तुमचे क्रिएशन ठरू शकत नाही. त्यासाठी वाचन संस्कृती जाेपासावी लागेल. प्रत्येक घरात लायब्ररी असावी अाणि या लायब्ररीतील पुस्तके बंदीस्त असू नये असेही त्यांनी सांगितले.

नामवर सिंह यांनी आपल्या भाषणात डॉ. नेमाडे यांच्या भारतीय साहित्यातील योगदानावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाची सुरुवात इंदू जैन यांनी सादर केलेल्या सरस्वती वंदनेने झाली. त्रिशला जैन यांनी स्वागत पर भाषण केले तर साहु अखिलेश जैन यांनी आभार मानले..
योग्य तेच लिहीन
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. नेमाडे म्हणाले, हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर जबाबदारी जास्त वाढली आहे. भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार जसा सुखावून जातो तसाच तो जबाबदारीची आठवणही करून देतो, ही जाणीव ठेवत मी मानवतेसाठी आणि योग्य तेच लिहीन. डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या भाषणात आपल्या जन्मगावातून आपल्यावर झालेल्या साहित्यिक संस्कारापासून ते नाेकरी, लेखन आणि संशोधन अशा विषयांतून मिळत गेलेले ज्ञान व सृजनशील लिखाणप्रवासावर विस्तृत असा प्रकाश टाकला.

मराठीला चौथा सन्मान
यापूर्वी वि.स. खांडेकर यांना १९७४ मध्ये, कुसुमाग्रज यांना १९८७ अाणि विंदा करंदीकर
यांना २००३ मध्ये हा सन्मान मिळाला हाेता.
नेमाडेंचे भाषण इंग्रजीत!
पुरस्काराला उत्तर देताना नेमाडे यांनी ८ मिनिटात उरकतो, असे सांगत १६ मिनिटे इंग्रजीत भाषण केले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्यातील इंग्रजी शाळा बंद करा, असे म्हटले होते.