आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदी: विरोधकांचा आज \'आक्रोश\'; देश बंदची हाक, संसदेतही मोठ्या गदारोळाची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्राच्या नाेटबंदीच्या विराेधात तृणमूल, अन्य पक्षांसह काँग्रेस आज (साेमवार) भारत बंद नव्हे, देशव्यापी अाक्राेश दिन पाळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारच्या नोटबंंदीच्या निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्थेसह बाजारपेठेला मंदीची झळ पोहोचली आहे. त्यामुळे कोणतेही व्यवहार बंद न ठेवता बहुतांश विरोधी पक्षांनी 'भारत बंद'मध्ये सहभागी न होण्याचे ठरवले आहे. परिणामी संसदेतही विरोधकांची मोठा गदारोळ करण्याची शक्यता आहे.

केवळ ममता बॅनर्जी उतरल्या रस्त्यावर...
तृणमूल काँग्रेसने भारत बंदची हाक दिली आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वत: रस्त्यावर उतरणार आहेत. जनता दलने (संयुक्त) मात्र भारत बंदमध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने ब्लॉक, जिल्हा व प्रदेश स्तरावरील शाखांना तसेच पक्षाच्या युवक, विद्यार्थी, महिला, शाखांसह सेवादलाला निदर्शने न करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा...पंतप्रधानांंनी विरोधी पक्षांंवर चढवला हल्ला... अमित शहा म्हणाले, 'नोटबंदीमुळे राहुल, ममता यांची झोप उडाली'

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...