आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bharat Ratna For Dilip Kumar? Modi Govt Is Contemplating To Honour Veteran Actor

दिलीपकुमार यांना ‘भारतरत्न’ मिळणार!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रुपेरी पडद्यावरील ट्रॅजडी किंग दिलीपकुमार यांना भारताचा सर्वाेच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ यावर्षी मिळण्याची शक्यता बळावली अाहे. केंद्रीय गृहविभागात यासंदर्भात हालचाली सुरू असून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याही पसंतीचे हे नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पाकिस्तानमधील पेशावर येथे १९२२ मध्ये िदलीपकुमार (युसूफ खान) यांचा जन्म झाला. अभिनय क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना अाजवर भारतातील पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, अनेक िफल्मफेयर पुरस्काराने सन्मानित करण्यात अाले अाहे. पाकिस्ताननेही ‘निशाण-ए- पाकिस्तान’ किताब देऊन त्यांना गाैरविलेले अाहे. दिलीपसाब सध्या ९३ वर्षांचे अाहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त केली जात अाहे. त्यांचे सध्याचे वय अाणि प्रकृती पाहता यावर्षी दिलीपकुमार यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर हाेऊ शकताे, अशी माहिती सूत्रांनी दिली.