आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारती एअरटेलला 350 कोटींचा दंड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दूरसंचार विभागाने भारती एअरटेलला सात सर्कल्समधील थ्रीजी सेवा बंद करण्याचा आदेश दिला आहे. हरियाणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश (पूर्व), कोलकाता, गुजरात, केरळ आणि मध्य प्रदेशमध्ये एअरटेलकडे स्पेक्ट्रम नसतानाही कंपनी इतर कंपन्यांसोबत करार करून सेवा देत होती. याप्रकरणी एअरटेलला 350 कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. कंपनीने या आदेशाला दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले आहे.

थ्रीजी सेवा बंद करून 18 मार्च दुपारी तीन वाजेपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दूरसंचार विभागाने (डॉट) एअरटेलला दिले आहेत. एअरटेलने 2010 मध्ये 22 पैकी 13 सर्कल्समध्ये थ्रीजी स्पेक्ट्रम मिळवला होता.