आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bharati Airtel Not Enroll In 3 G Process : Supreme Court

3 जी लिलावात भारती एअरटेलने सहभागी होऊ नये : सर्वोच्च न्यायालय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचे मुख्‍य न्यायमूर्ती अल्तमस कबीर व विक्रमजित सेन यांच्या पीठाने गुरूवारी (ता.11) भारती एअरटेलला 3 जी सेवेच्या नवीन लिलावात सहभागी न होण्‍याचा आदेश दिला. या आदेशानुसार एअरटेल कंपनीला कोलकाता, पूर्व उत्तर प्रदेश , महाराष्‍ट्र, मध्‍य प्रदेश, हरियाणा , केरळ , गुजरात या सात परिमंडळांच्या लिलावात सहभागी होता येणार नाही.


एअरटेल कंपनीकडे कोणताही अधिकृत परवाना नसताना सात परिमंडळामध्‍ये ग्राहकांना 3 जी सेवा पुरवत होती, असा आरोप रिलायन्स आणि दुरसंचार विभागाने कंपनीवर केला होता. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले , एअरटेल कंपनीने ज्या परिमंडळामध्‍ये परवाना घेतलेला नाही तेथील 3 जी सेवा तात्काळ बंद करावी .