आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bharti Wife Forced To Have Abortion Slash Wrists

गर्भपातासाठी दबाव टाकायचे AAP नेते भारती, अंगावर कुत्रा सोडायचे; पत्नीचे आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे माजी कायदेमंत्री आणि आपचे आमदार सोमनाथ भारती यांच्यावर त्यांची पत्नी लिपिका मित्राने गंभीर आरोप केले आहेत. भारती हे गर्भपातासाठी दबाव टाकत होते, अशी तक्रार त्यांनी दिल्ली महिला आयोगाकडे केली आहे. गर्भवती असताना भारती त्यांच्या अंगावर चावण्यासाठी कुत्रा सोडायचे असा आरोपही त्यांनी केला आहे. भारती यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

वेगळ्या राहतात लिपिका
दिल्ली महिला आयोगाला दिलेल्या 26 पानी तक्रारीमध्ये लिपिका यांनी म्हटले आहे की, त्यांची दोन मुले आहेत आणि त्या तिसऱ्यांदा गर्भवती राहिल्या तेव्हा त्यांच्या पती सोमनाथ भारती यांनी त्यांच्यावर गर्भपातासाठी बराच दबाव टाकला. लिपिका यांच्या मते भारती यांच्या अमानुष वागणुकीला कंटाळून त्यांनी हाताची नस कापून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. लिपिका या जेव्हा दुसऱ्यांदा गर्भवती होत्या त्यावेळी भारती त्यांच्या अंगावर कुत्रा सोडायचे असेही त्यांनी सांगितले. सध्या लिपिका त्यांच्या दोन मुलांसह द्वारका भागात स्वतंत्र राहतात.

केजरीवाल कारवाई करणार का?
दिल्ली महिला आयोगाने भारती यांना एक नोटीस जारी केली आहे. त्यांना 26 जूनला महिला आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा बरखा शुक्ला सिंह म्हणाल्या की, भारती आणि लिपिका यांचा विवाह शादी डॉटकॉम वेबसाइटद्वारे झाला होता. बरखा म्हणाल्या की, जेव्हा कुमार विश्वास यांचे प्रकरण समोर आले त्यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल कुमार यांच्या बाजुने होते. आता या आमदारावर तरी ते कारवाई करणार का? असा सवाल त्यांनी केला आहे.

खोटे बोलले भारती
भारती यांनी ते एका आंतरराष्ट्रीय फर्मचे मालक असल्याचे लिपिका यांना सांगितले होते. लग्न आणि हनिमूनदरम्यानही त्यांनी त्यांची खरी माहिती सांगितली नाही, अशी तक्रार लिपिका यांनी केली आहे. हनिमूनदरम्यानही भारती यांची वर्तणूक चांगली नव्हती आणि त्यादरम्यानच त्यांनी आर्थिक स्थिती खालावलेली असल्याचेही सांगितले होते, असे लिपिका म्हणाल्या. हनिमूनहून परतताच भारती आणि त्यांच्या आईने त्यांचे पूर्ण दागिने आणि भेटवस्तू मागितल्या. गर्भवती असल्याने त्यांचे ऐकले कारण त्यांना भारती आणि त्यांच्या कुटुंबाची गरज होती, असे लिपिका यांनी सांगितले. गर्भवती असतानाही भारती यांची आई शारिरीक आणि मानसिक छळ करत असल्याचा आरोप लिपिका यांनी केला आहे. दरम्यान, भाजप आणि काँग्रेसनेही भारती यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाला सुरुवात केली आहे.