आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉवर कॉन्क्लेव्हमध्ये सरकारी-खासगी क्षेत्रांचा मुख्य सहभाग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दैनिक भास्कर समूहाच्या वतीने आयोजित तिसर्‍या 'पॉवर व्हिजन कॉन्क्लेव्ह-2013'मध्ये वीजनिर्मिती क्षेत्रातील सरकारी व खासगी कंपन्यांचे सीएमडी, सीईओ तसेच अन्य वरिष्ठ पदाधिकारी सहभागी होतील. 28 मार्चला दिल्लीत होत असलेल्या या कॉन्क्लेव्हमध्ये ऊर्जा क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञांचाही सहभाग असेल. या पॉवर व्हिजन कार्यक्रमाचे संयोजक म्हणून सुकॅम, जिंदल समूह, बंगाल एमटा, वेदांता, पहाडपूर अशा समूहांचा सहभाग असेल. 'एबीपी न्यूज' माध्यम प्रायोजक आहे.


वीजनिर्मिती क्षेत्रातील विविध पैलूंचा विचार करता उपलब्ध नव्या संधी आणि त्यातील आव्हानांवर चर्चा करण्यासाठी देशातील सर्वाधिक वीजनिर्मिती करणारी सरकारी कंपनी म्हणून ओळख असलेल्या'एनटीपीसी'चे प्रमुख तसेच अन्य अधिकार्‍यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. हायड्रो इलेक्ट्रिकवर चर्चा करण्यासाठी एनएचपीसी, एसजीव्हीएनसारख्या सरकारी कंपन्या सहभागी होण्याची शक्यता आहे. वीजनिर्मिती धोरणांशी संबंधित विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या अधिकार्‍यांसह नियोजन आयोगाचे अधिकारी सहभागी होण्याची शक्यता आहे. वीज कंपन्यांना येणारी निधीची अडचण व त्यावरील उपाययोजनांविषयी चर्चा करण्यासाठी पॉवर फायनान्स कार्पोरेशन व रूरल इलेक्ट्रिफिकेशन कार्पोरेशनसह अनेक वित्तीय संस्थांना आमंत्रित करण्यात आले आहे. वीजनिर्मितीशी संबंधित कंपन्यांमध्ये प्रामुख्याने जिंदर पॉवर, जीएमआर, अवंता पॉवर व अन्य कंपन्या कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.

दैनिक भास्कर समूहाने जानेवारी 2011 मध्ये पहिली पॉवर व्हिजन कॉन्क्लेव्ह आयोजित केली होती. दुसरी अशी कॉन्क्लेव्ह गेल्या वर्षी मार्चमध्ये आयोजित करण्यात आली होती.