आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhaskar Groups Third Power Vision Enclave At Delhi

भास्कर समूहाची तिसरी पॉवर व्हिजन कॉन्क्लेव्ह दिल्लीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दैनिक भास्कर समूहाच्या वतीने आयोजित तिसरी 'पॉवर व्हिजन कॉन्क्लेव्ह' 28 मार्च रोजी नवी दिल्लीत होत आहे. देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडणार्‍या ऊर्जा क्षेत्रातील विविध पैलूंसोबत त्यातील संधी व आव्हानांवर यात गांभीर्याने चर्चा होईल. वीजनिर्मितीसाठी सध्या जाणवत असलेला इंधनाचा तुटवडा, धोरण निश्चितीतील समस्या पर्यावरण विभागाची मंजुरी आणि निधीची तरतूद असे मुद्दे प्रामुख्याने चर्चिले जातील.

बाराव्या पंचवार्षिक योजनेत वीजनिर्मिती क्षेत्रात खासगी उद्योगांना अधिक वाटा दिला तरी खासगी वीजनिर्मिती करणार्‍या कंपन्यांना प्रकल्प उभारणीसाठी सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्या व उपायांवर कॉन्क्लेव्हमध्ये व्यापक चर्चा होईल. सध्या वीजनिर्मिती क्षेत्रात सध्या हायड्रो तसेच अक्षय्य ऊज्रेचा (रिन्युएबल एनर्जी) वाटा वाढत चालला आहे. भावी काळात विजेची गरज भागवण्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

हायड्रो व अक्षय्य ऊज्रेचे उद्दिष्ट्ये गाठत असताना येणार्‍या अडचणी व त्यांची सोडवणूक करण्यासाठीचे उपाय यावर कॉन्क्लेव्हमध्ये चर्चा होईल. या माध्यमातून हायड्रो इलेक्ट्रिसिटीसह सोलार व वायूपासून वीजनिर्मितीसारख्या क्षेत्रांनाही प्रोत्साहन मिळू शकेल. जानेवारी 2011 मध्ये भास्कर समूहाने सर्वप्रथम पॉवर व्हिजन कॉन्क्लेव्हचे आयोजन केले होते. दुसरी कॉन्क्लेव्ह गेल्या वर्षी मार्चमध्ये पार पडली होती.