आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भास्कर डॉट कॉम’ला वाचकांची सर्वाधिक पसंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/नोएडा - दैनिक भास्कर समूहाची dainikbhaskar.com ही नेटक-यांची सर्वाधिक पसंतीची वेबसाइट आहे. या वस्तुस्थितीवर आता अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब झाले आहे. इंटरनेट ट्रॅफिकचा लेखाजोखा ठेवणा-या कॉमस्कोअरनुसार इतर कोणत्याही वेबसाइटच्या तुलनेत dainikbhaskar.com वर वाचकांनी सर्वाधिक वेळ व्यतीत केला आहे. अमेरिकेतील इंटरनेट विश्लेषक कंपनी कॉमस्कोअरद्वारे जारी होणारी आकडेवारी सर्वाधिक विश्वासार्ह मानली जाते.


कॉमस्कोअरच्या जुलैतील अहवालानुसार dainikbhaskar.com वर युझर्सने 14 कोटी 70 लाख (147 मिलियन) मिनिटे घालवली. दुसरा व तिसरा क्रमांकावर ओएमजी याहू व टाइम्स ऑफ इंडिया (पहा : तक्ता) होते. याच महिन्यात dainikbhaskar.com वर युझर्सनी दररोज 79 हजार तास व्यतीत केले.


dainikbhaskar.com वेबसाइट वाचकांना त्यांची गरज व आवडीनुसार कंटेट देत असल्याचे कॉमस्कोअरच्या या आकडेवारीने स्पष्ट झाले आहे. 800 पेक्षा अधिक शहरांतील ताज्या घडामोडींसह बॉलीवूड, आयुष्य व्यवस्थापन, सेलेब्रिटी, गॅजेट आदी मुद्द्यांवरील बातम्या व माहितीपर मजकूर व इनसाइड स्टोरीजची भास्कर.कॉमवर रेलचेल असते. यामुळेच युझर्स dainikbhaskar.com वर सर्वाधिक वेळ व्यतीत करतात.


विशेष म्हणजे, दैनिक भास्कर समूहाची dainikbhaskar.com वेबसाइट जगातील पहिल्या क्रमांकाची हिंदी साइट असून तिला ऑगस्टमध्ये 24 कोटी हिट्स मिळाल्या आहेत. तसेच dainikbhaskar.com ही गुजराथीमधील सर्वात मोठी वेबसाइट असून तिला 12 कोटी हिट्स मिळाल्या आहेत. भास्कर समूहाची इंग्रजी साइट daily.bhaskar.com
नेही बातम्या व एंटरटेनमेंट साइटच्या स्वरूपात अल्पावधीतच मोठे यश मिळवले आहे. याशिवाय divyamarathi.com ही सर्वाधिक वेगाने वाढणारी मराठी वेबसाइट ठरली आहे. ऑगस्टमध्ये भास्कर समूहाच्या चारही वेबसाइट्नी 38 कोटी हिट्स मिळवत इतर साइट्वर मोठी आघाडी घेतली आहे.