आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिवाळीपूर्वी 17 धमाके करण्याचे भटकळला होते टार्गेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - यासीन भटकळ दिवाळीपूर्वी देशभरात 17 ठिकाणी स्फोट घडवून आणणार होता. अब्दुल करीम टुंडाच्या अटकेनंतर त्याला ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. या स्फोटांची तयारी आणि मदतीसाठी तो नेपाळच्या पोखरा व भरतपूरसारख्या ठिकाणी राहून पाकिस्तानच्या संपर्कात होता.

या कारस्थानाची माहिती मिळाल्याने भारतीय गुप्तचर संस्थांनी मंगळवारी मुसळधार पावसात पहाटे तीन वाजता भटकळला अटक केली. यासीनबाबत सहा महिन्यांपूर्वीच माहिती मिळाली होती असे, सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानंतर बिहारच्या बुद्धगयामध्ये झालेल्या दरभंगा मॉडेलचा वापर झाल्याचे समोर आले होते. त्याचा तपास करणार्‍या गुप्तचर संस्था भारत-नेपाळ सीमा आणि बिहार, उत्तर प्रदेशच्या सीमांवर तपास करत होत्या. याचदरम्यान टुंडाने भारतात स्फोटांची जबाबदारी भटकळ बंधूंना दिली जाऊ शकते अशी माहिती दिली. त्यावर भटकळने मोहंमद असद नावाने पासपोर्ट बनवून ठेवला असल्याचे तपास संस्थांना समजले. त्यानंतर नेपाळवर पाळत ठेवली जाऊ लागली. तेव्हा पोखरा व भरतपूरमध्ये तो आयएसआयसोबत काम करत असल्याची माहिती मिळाली.

यासंदर्भात गृहमंत्रालयाला माहिती दिल्यानंतर 23 ऑगस्टला एक महत्त्वाची बैठक झाली. त्यात कारवाईला हिरवी झेंडी दाखवण्यात आली होती. त्यानुसार गुप्तचर संस्थांनी त्याला नेपाळमध्येच पकडले आणि रक्सोल, सुगौली मार्गे बिहारच्या चंपारणमध्ये आणण्यात आले. भारतात विविध ठिकाणी स्फोट करण्यासाठी निगराणीचे काम करत असल्याचे भटकळने प्राथमिक चौकशीत मान्य केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.