आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दैनिक दिव्य मराठी: बुवा-बाबांवर पहिला देशव्यापी सर्व्हे; 15 प्रश्नांची उत्तरे देऊन नोंदवा तुमचे मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशात तथाकथित बाबा- बुवांची अनेक धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. अासाराम,रामपाल, राम रहीमसह देशभरातील अनेक बुवा- बाबांची प्रकरणे सध्या चर्चेत येत अाहेत. या घटनांमुळे असे बाबा लाेक किती खरे याबाबत लाेकांच्या मनात शंका उपस्थित हाेत अाहेत. त्यांची वागणूक, संपत्ती, भूमिकेवरही टीका-टिप्पणी हाेत अाहेत. या पार्श्वभूमीवर दैनिक भास्कर व दैनिक दिव्य मराठी बुवा-बाबांविषयी देशाचा दृष्टिकाेन जाणून घेण्याचा प्रयत्न करत अाहे. त्यासाठी देशातील बाबांविषयीचा पहिला सर्व्हे केला जात अाहे. अशा घटनांमुळे लाेकांच्या श्रद्धेला धक्का लागला अाहे की त्यांचा बाबांवर विश्वास अजूनही कायम अाहे हे या सर्व्हेतून जाणून घेण्याचा प्रयत्न अाहे. 
अापणही खालील प्रकारे या सर्व्हेत सहभागी हाेऊन १५ प्रश्नांची उत्तरे देऊ शकता. अाजच्या अंकात पान क्र. वर ही प्रश्नावली प्रसिद्ध करण्यात अाली अाहे. 

खालीलप्रकारे तुम्ही तुमचे मत नाेंदवू शकता 

1.अाज प्रकाशित झालेल्या प्रश्नांचे कात्रण अापल्या जवळच्या दैनिक भास्कर/ दिव्य मराठी कार्यालयात जमा करू शकता. 
2. 8955776637यामाेबाइल क्रमांकावर मिस काॅल द्या. 
तुम्हाला त्वरित मेसेजद्वारे लिंक मिळेल. या लिंकवर क्लिक केल्यास सर्व्हेचा फाॅर्म तुमच्या माेबाइलवर दिसेल. ताे भरून देता येईल. 
3. Divyamarathi.comवर तुम्ही फाॅर्म भरू शकता. 
4. दिव्य मराठीच्या फेसबुक पेजवरील https://goo.gl/SXVdn4यालिंकवर जाऊनही सर्व्हेचा फाॅर्म भरता येईल. 
सर्व्हेचाफाॅर्म अाजच भरा. जमा करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर. 
बातम्या आणखी आहेत...