आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजा प्रकरण : भुजबळ म्हणाले, मलिकने सदनाची वाट लावली, मुख्यमंत्रीही जबाबदार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाराष्ट्र सदनातील निवासी आयुक्त बिपीन मलिक यांच्या विरोधात शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभा सभापतींकडे हक्कभंगाच्या प्रस्तावाची नोटीस सादर केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी या प्रकरणी शिवसेना खासदारांची पाठराखण करत मलिकवर आरोप केले आहेत. मलिक यांनी पहिल्या दिवसापासून याठिकाणी मनमानी कारभार केल्याचे भुजबळ म्हणाले. तसेच या प्रकरणी वारंवार तक्रार करूनही मुख्यमंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही भुजबळ यांनी केला आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भुजबळ यांनी आपले हे मत मांडले.महाराष्ट्र सदनातील एकूणच परिस्थितीवर छगन भुजबळ यांनी बोट ठेवले आहे. शिवसेनेच्या खासदारांनी लावलेल्या आरोपांचे भुजबळ यांनी समर्थन केले आहे. येथील निवासी आयुक्त मलिक हे व्यवस्था चांगली ठेवत नाही. त्यामुळे खासदारांना चांगल्या सोयी सुविधा मिळत नाहीत. तसेच मलिक काही खासदारांना वेगळी आणि इतरांना वेगळी वागणूक देतात. त्यामुळे शिवसेना खासदारांचा राग अनावर झाला असणार असे छगन भुजबळ म्हणाले आहेत. तसेच हा प्रकार मुद्दामहून केला असेल असे आपल्याला वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी शिवसेना खासदारांनी माफी मागितली असल्यामुळे हे प्रकरण पार वाढवू नये असे वाटत अशल्याचे मतही छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
पुढील स्लाइडवर वाचा... काय म्हणाले राज ठाकरे?