आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhullar Depressing Patient; Home Ministry Report

भुल्लरला नैराश्याचा गंभीर आजार ; गृह मंत्रालयाकडे अहवाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देविंदरपाल सिंग भुल्लर याच्या फाशीच्या शिक्षेबाबत निर्णय घेण्यासाठी दिल्ली सरकारने भुल्लरचा वैद्यकीय अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भुल्लरला नैराश्याचा गंभीर आजार जडला असल्याचे अहवालात म्हटले आहे. वैद्यकीय मंडळाने भुल्लरचा वैद्यकीय अहवाल गेल्या महिन्यात दिल्ली सरकारकडे सादर केला आहे. भुल्लर मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त नसून त्याच्यात कमालीचे नैराश्य आले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. दोषी शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त नसेल तर त्याला फाशीची शिक्षा देत येत नाही.

ह्युमन बिहेवियर अ‍ॅँड अलायड सायन्सेसमध्ये (आयएचबीएएस) भुल्लरवर दोन वर्षांपासून उपचार सुरू आहेत. भुल्लरला नैराश्याने ग्रासले असून त्याच्यात आत्महत्येचे सतत विचार येत असल्याचे त्याच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांचे म्हणणे आहे.सप्टेंबर 1993 मध्ये येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकणात भुल्लरला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या स्फोटात नऊ जण ठार, तर 25 जण जखमी झाले होते. जखमींमध्ये युवक कॉँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष एम.एस.बिट्टा यांचा समावेश होता. भुल्लरचा वैद्यकीय अहवाल दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर तेजिंद्र खन्ना यांच्याकडे पाठवला होता. त्यानंतर त्यांनी तो तिहार तुरुंगाच्या महासंचालकांकडे परत पाठवला.