आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan Rejects Reports Working In Modi Government Ad

मोदींच्या \'सेक्युलर\' जाहिरातीत झळकणार नाही, अमिताभ बच्चन यांनी ट्वीटरवर फेटाळले वृत्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महानायक म्हणून ओळख असलेल्या सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी मोदी सरकारच्या एका जाहिरातीत दिसणार असणारे माध्यमांतून आलेले वृत्त फेटाळून लावले आहे. ट्वीटरवर बिग बींनी याबाबत स्पष्टीकरण दिले.

केंद्र सरकार आपली धर्मनिरपेक्ष प्रतिमा तयार करण्यासाठी एक जाहिरात करणार असून त्यात बिग बी अमिताभ बच्चन झळकणार असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी ट्वीट करून सांगितले की, एका जाहिरातीसाठी मला पंतप्रधान कार्यालय आणि पंतप्रधानांनी संपर्क केल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत. पण ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. कृपया सर्वांनी चूक दुरुस्त करून घ्यावी. धन्यवाद.

बिग बींनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर अमिताभ यांच्याशी एका सरकारी जाहिरातीसाठी संपर्क साधण्यात आल्याचे वृत्त आले होते. या जाहिरातीत लोकांनी विकासाठी धर्म आणि जात याच्या पलिकडे जाऊन विचार करणे गरजेचे असल्याचे आव्हान अमिताभ करणार असल्याचे सांगण्यात आले होते.
ही जाहिरात 26 जानेवारीला प्रदर्शिक होऊन त्यात मोदींबरोबर अर्थमंत्री अरुण जेटली असणार हेही सांगण्यात येत होते. मात्र, बिग बींनी सर्व बाबी फेटाळल्या आहेत. यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी गुजरात टुरिझमच्या जाहिराती केल्या आहेत.

पुढे पाहा, संबंधित PHOTO