आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Big B Will Be New Brand Ambassador For Incredible India

बिग बी होणार पर्यटन विभागाचे अॅम्‍बेसडर, अमीर म्‍हणाला- ‘भारत अतुल्य’च

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो. - Divya Marathi
फाइल फोटो.
नवी दिल्ली - पर्यटन विभागाच्‍या ‘अतुल्य भारत’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेच्‍या ब्रँड अॅम्‍बेसिडरपदावरून अ‍मीर खान याची हकालपट्टी करण्‍यात आल्‍यानंतर या पदावर आता अमिताभ बच्चन यांची वर्णी लागणार आहे. त्‍या दृष्‍टीने केंद्र सरकारने हालचाली गतीमान केल्‍या असून, या संदर्भात अमिताभ यांच्‍यासोबत चर्चाही केली. दरम्‍यान, अमिताभने सरकारचा हा प्रस्‍ताव मान्‍य केला आहे.

हटवले नाही करार संपला : पर्यटन मंत्री
- 'अतुल्य भारत' आणि 'अतिथी देवो भव' या केंद्राच्या पर्यटनवृद्धी मोहिमेच्या ब्रॅंड अॅम्बेसिडरपदी कॉंग्रेस सरकाने अमीरची आठ वर्षांकरिता नियुक्‍ती केली होती.
- मोदी सरकारनेही त्‍याला कायम ठेवले.
- अमीरला आम्‍ही हटवले नसून त्‍याचा करार संपला आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी दिली.
- मात्र अलीकडे त्याने असहिष्‍णुतेबाबतचे विधान केल्याने त्‍याची हकालपट्टी करण्‍यात आल्‍याची चर्चा आहे.

अमिरने नेमके काय म्‍हटले होते
?
अमिरने देशातील असहिष्णुतेबद्दलचे वक्तव्य केले होते. 'आपल्या आजूबाजूला काय घडत आहे, हे मी एक व्यक्ती, एक नागरिक आणि या देशाचा एक भाग म्हणून आपण वर्तमानपत्रांतून वाचतो, टीव्हीवर पाहतो. त्यामुळे निश्चितपणे मी धास्तावलेलो आहे. त्याचा इन्कार करू शकत नाही. अनेक घटनांनी मला चिंतेत टाकले. मुलांच्या सुरक्षेबाबतच्या भीतीमुळे एकदा तर पत्नीने (किरण राव) भारतच सोडून जाऊ, अशी इच्छा व्यक्त केली होती, असे आमिरने म्हटले होते. आमिरच्या वक्तव्यावरुन देशात चौफेर रान पेटले होते. सोशल मीडियावर तर आमिरच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेण्यात आला.
पुढे वाचा, अमीर म्‍हणाला- ‘भारत अतुल्य’च