आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Big Commission Agents Who Were Influential In Big Deals For India

या दलालांनी देशाला लावला चुना, बड्या नेत्‍यांसोबत होते घनिष्‍ठ संबंध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- देशातील दहशतवादी संघटना आणि इशान्‍येकडील बंडखोरांना चीनकडून शस्‍त्रास्‍त्रे पुरविण्‍यात येत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. शस्‍त्रास्‍त्र पुरवठ्यात मध्‍यस्‍थाची भूमिका बजावणा-याला थायलंड पोलिसांनी अटक केली आहे. एंथोनी सिमरे असे त्‍याचे नाव आहे. त्‍याला भारताच्‍या विनंतीवरुन थायलँड पोलिसांनी अटक केली आहे. तो थायलँडचाच रहिवासी असून मोठा शस्‍त्र दलाल आहे. त्‍याची चौकशी करण्‍यासाठी एनआयएचे एक पथक थायलँडला पोहोचले आहे.

विली असे त्‍याचे टोपणनाव आहे. त्‍याचे वय 57 वर्षांचे असून मोठ्या प्रमाणात तो शस्‍त्रास्‍त्रे खरेदी करुन इशान्‍येकडे नागा बंडखोरांना पुरवठा करतो. त्‍याने आरोप फेटाळले आहेत. परंतु, त्‍याचे तार चीन, उत्तर कोरिया, थायलँड, बांगलादेश, नेपाळ आणि म्‍यानमारपर्यंत जुळलेले आहेत. चीनच्‍या शस्‍त्र विक्रेत्‍यांसोबत त्‍याचे संबंध असून त्‍याने 1 हजार रॉकेट आणि 647 एके-47 रायफल्‍सच्‍या विक्रीमध्‍ये दलाली केली होती.

दरम्‍यान, सीबीआयने शस्‍त्रास्‍त्र दलालीप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री जगदीश टायटलर आणि दलालीचा आरोप असलेल्‍या अभिषेक शर्मा यांच्‍याविरुद्ध आणखी एक आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रावरुन शस्‍त्र दलाल आणि राजकीय नेत्‍यांमधील घनिष्‍ठ संबंध पुन्‍हा समोर आले आहेत. भारतात शस्‍त्रदलाली नवी नाही. 80 च्‍या दशकात बोफोर्स तोफांच्‍या खरेदीप्रकरणातील दलालीचे वादळ आजही शांत झालेले नाही.

देशात होणा-या अनेक मोठ्या व्‍यवहारांमध्‍ये दलालांची मोठी भूमिका राहीलेली आहे. या दलालांविना कोणताही मोठा व्‍यवहार देशात होत नाही, असे बोलले जाते. हायप्रोफाईल दलालीच्‍या प्रकरणांमध्‍ये अनेक बडे नेते, अधिकारी, उद्योजक आणि त्‍यांच्‍या निकटच्‍या व्‍यक्तींवर आरोप लागले आहेत. परंतु, ते सिद्ध करुन शिक्षा ठोठवणे अद्याप शक्‍य झाले नाही. त्‍यामुळे सीबीआयच्‍या विश्‍वासार्हतेवर अनेकदा प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले आहे.


(फोटोः शस्‍त्र दलाल अभिषेक वर्मा परदेशी मुलींसोबत)

पुढील स्‍लाईड्समध्‍ये वाचा अशा दलालांबद्दल ज्‍यांनी देशातील मोठ्या व्‍यवहारांमध्‍ये मध्‍यस्‍थाची भूमिका बजावली आणि निर्णय प्रभावित केले....