आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'नरेंद्र मोदींच्या सभेसाठी कशी जमवली गर्दी, प्रत्येकाला किती पैसे दिले ?\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबादच्या सभेतील गर्दीपाहून मोदींमध्ये उत्साह संचारला होता. त्यामुळेच त्यांनी सभेसाठी उपस्थित लोकांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामांप्रमाणे ‘यस वुई कॅन’ आणि ‘यस वुई विल डू’ चा मंत्र दिला.

मोदींची ही ओबामा स्टाईल काँग्रेसला आवडलेली नाही. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी मोदींच्या ‘यस वुई कॅन’ मंत्राची खिल्ली उडवत म्हटले आहे, की आमच्याकडेही एक देशी ओबामा आहे, जे खोटे बोलतात. तर, काँग्रेसचे दुसरे एक नेते राशिद अल्वी म्हणाले, की या स्टाइलचा मोदींना काहीही फायदा होणार नाही. सभेसाठी जमलेल्या हजारोंच्या समुदायाबद्दल मात्र त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. निवडणूकीच्या काळातील सभांनाही एवढी गर्दी जमा होत नाही, एवढे लोक कुठून आणले, असा प्रश्न उपस्थित करत, त्यांना किती पैसे दिले होते असेही ते म्हणाले.

मोदींच्या भाषणात कट्टरवादी भूमिका सोडली तर सगळेकाही होते. काँग्रेस आणि केंद्र सरकारवर टीका करण्याची एकही संधी त्यांनी या वेळी सोडली नाही.

पुढील स्लाइडमध्ये, मोदींनी कसा साधला काँग्रेसवर निशाणा...
मोदींच्या निवडणूक गाडीचे 5 गिअर