आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Big Setback For Ashok Chavan In \'Paid News\' ROW

पेड न्यूज प्रकरणी अशोक चव्हाणांना सुप्रीम कोर्टाचा दणका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पेड न्यूज प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. पेड न्यूज प्रकरणी सदस्यत्व रद्द करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला असल्याचे स्पष्ट करत चव्हाण यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.
निवडणूक आयोगाने चव्हाण यांच्या निवडणूक खर्चाबाबत ४५ दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडमुकांदरम्यान अशोक चव्हाण यांनी माध्यमांमध्ये पेड न्यूज (जाहिरात पुरस्कृत वृत्त) छापून आणल्यासंदर्भात भाजप नेते किरिट सोमैय्या, मुख्तार अब्बास नक्वी, डॉ. माधव किन्हाळकर यांच्यासह इतरांनी तक्रार दाखल केली होती. या खर्चाचा तपशील चव्हाण यांनी निवडणूक खर्चामध्ये दिला नसल्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती.
अशोक चव्हाण यांनी मात्र यासंदर्भात करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. वृत्तपंत्रांनी मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपण केलेल्या कार्याची दखल घेऊन संबंधित वृत्त प्रकाशित केले होते. त्यासाठी पैसे दिले नसल्याचा दावा चव्हाण यांनी केला होता.