नवी दिल्ली- बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 243 जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा 12 ऑक्टोबर, दुसरा 16 ऑक्टोबर, तिसरा 28 ऑक्टोबर,चौथा 1 नोव्हेंबर तर पाचव्या टप्प्यात 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आठ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. 12 नोव्हेंबर रोजी निवडणुकीची सर्व प्रक्रिया संपलेली असेल. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम अहमद जैदी यांनी पत्रकार परिषदेत बिहार निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला.
मतदान 12 ऑक्टोबरपासून तर 8 नोव्हेंबरला मतमोजणीटप्पे | तारीख | विधानसभेच्या जागा व जिल्हे |
पहिला | 12 ऑक्टोबर | 49 (समस्तीपूर, बेगुसराय, खगडिया, भागलपूर, बांका, मुंगेर, लखीसराय, शेखपूरा, नवादा, जमुई) |
दुसरा | 16 ऑक्टोबर | 32 (भभुआ, रोहतास, अरवल, जहानाबाद, औरंगाबाद, गया) |
तिसरा | 28 ऑक्टोबर | 50 (सारण, वैशाली, नालंदा, पाटणा, भोजपूर, बक्सर) |
चौथा | 1नोव्हेंबर | 55 (पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, शिवहर, सीतामढी, मुजफ्फरपूर, गोपाळगंज, सीवान) |
पाचवा | 5 नोव्हेंबर | 57 (मधुबनी, सुपौल, अररिया, किशनगंज, पूर्णिया, कटिहार, मधेपुरा, सहरसा, दरभंगा) |
बिहारमध्ये आजपासून आचारसंहिता लागू होत आहे. बिहार निवडणुकीसाठी एकूण 243 मतदारसंघातील 6 कोटी 68 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. आगामी काळातील सण-उत्सव लक्षात घेऊनच बिहार निवडणुकीची तारीख ठरवण्यात आल्या असल्याचे नसीम अहमद जैदी यांनी यावेळी सांगितले.
बिहारमधील 38 पैकी 29 जिल्हे नक्षल प्रभावित आहेत. सर्व मतदान केंद्रांवर पॅरामिलिटरी फोर्सेस तैनात करण्यात येणार आहेत. निवडणुका शांतपणे पार पाडण्यासाठी कुठलेही गैरप्रकार होऊ नये, यासाठी सगळी उपाययोजना करण्यात येत आहे. मतदारांना धमकी देणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मतदारांना मद्य आणि पैशाचे आमिष दाखवून मते विकत घेणार्या उमेदवारांवर बारीक लक्ष दिले जाणार आहेत. त्यामुळे या गोष्टीला आळा घालण्यासाठी अभ्यासपूर्वक नियोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पेड न्यूज किंवा तत्सम गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोग कटीबद्ध असणार आहे. निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी 243 साधारण निरीक्षक आणि 38 पोलिस निरीक्षक सतर्क राहाणार आहेत. परवाना धारकांकडून शस्त्र जमा करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.
ईव्हीएम मशिनवर चिन्हासोबत उमेदवारांचे छायाचित्र
ईव्हीएम मशिनवर निवडणूक चिन्हासोबतच उमेदवारांचे छायाचित्र दिसणार आहेत. देशात पहिल्यांचा हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
बिहारमध्ये 'पंतप्रधान विरुद्ध मुख्यमंत्री'बिहारमधील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री नितीशकुमार अशी लढत रंगणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. नरेंद्र मोदी यांनी बिहारसाठी विशेष पॅकेज जाहीर करून नितीश कुमार यांच्यावर सरशी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे बिहारमध्ये भाजपचे कमळ फुलणार की नितीशराज कायम राहाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मोदी v/s नितीश
मोदी | नितीश |
शक्तिशाली नेता | बिहारमध्ये विकास केल्याचे क्षेय |
अप्पर कास्ट मतदारांवर पकड | ओबीसी आणि मुस्लिम मतदारांवर पकड |
निवडणुकीच्या काळात केंद्रात सरकार | निवडणुकीच्या काळात राज्यात सरकार |
पासवान यांचे समर्थन | लालू यांचे समर्थन |
मांझी-पासवान यांच्या समन्वय साधणे, हे मोठे आव्हान | जदयू-आरजेडीमध्ये बंडखोर नेत्यांमध्ये समन्वय साधणे, हे मोठे आव्हान |
पुढील स्लाइडवर वाचा, समाजवादी पार्टीचा जनता परिवाराशी काडीमोड, महाआघाडीतून बाहेर...