आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा ३१ ऑगस्टपर्यंत , जदयू बंडखोरांचा भाजप प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा ३१ ऑगस्टपर्यंत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निवडणुका ४ टप्प्यांत होणार असून सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ऑक्टोबर अखेरीपर्यंत मतदान प्रक्रिया संपेल. निवडणुकीचे निकाल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम जैदी हे निवडणुकीचे अंतिम वेळापत्रक लवकरच जाहीर करतील. सध्या संबंधित अधिकाऱ्यांशी याविषयी चर्चा सुरू आहे.
बिहारमधील राजकीय पक्ष, राज्य निवडणूक आयोगाकडून यासंबंधी माहिती व अहवाल मागवण्यात आले होते. त्यावर चर्चा केल्यानंतर मतदानाचे वेळापत्रक आखण्यात येत आहे. उत्सवांच्या तारखा लक्षात घेऊन मतदानाचे दिवस निश्चित करण्यात आहेत.
रॅलीचा खर्च भाजप करणार
या महिन्यातच विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या भागलपूर रॅलीचा खर्च भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीद्वारे केला जाईल. आचारसंहिता लागू झाली तर मोदींच्या रॅलीचा खर्च निवडणूक खर्चात गणण्यात येईल. त्यामुळे तो केंद्रीय संघटनकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान जदयूचे ४ बंडखोर आमदार बुधवारी भाजपत सामील झाले. ज्ञानेंद्र सिंह ज्ञानू, राजेश्वर राय, सुरेश चंचल आणि दिनेश कुशवाहा यांनी केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांच्या उपस्थितीत भाजप सदस्यत्व ग्रहण केले. यापूर्वी जदयूचे बंडखोर आमदार राजीव रंजन सिंह आणि डॉ. सुनील कुमार यांनीही भाजपत प्रवेश केला होता. दरम्यान, छपराचे जदयू आमदार गौतम सिंह यांनीही एनडीएचा घटक पक्ष राष्ट्रीय लोक समता पार्टीत सामील होण्याची घोषणा केली आहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, नितीशकुमार - केजरीवाल एकत्र..