आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीशकुमारांनी महिलांना दिलेले आश्वासन केले पूर्ण, 1 एप्रिलपासून राज्यात दारुबंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहार पुढील वर्षी 1 एप्रिलपासून दारूमुक्त होणार आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात याची घोषणा केली. ते म्हणाले, दारुबंदीमुळे महसुल कमी होईल, मात्र त्यासाठी दुसरा काही पर्याय शोधला जाईल. आम्ही बिहारच्या माता-भगिणींनी दारुमुक्त बिहारचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण करणे अधिक महत्त्वाचे आहे. गेल्या वर्षी बिहारच्या तिजोरीत दारुविक्रीतून 3500 कोटी रुपये महसूल जमा झाला होता. राज्य सरकार येत्या एप्रिलपासून त्याला मुकणार आहे.
काय म्हणाले नितीशकुमार
>> नितीशकुमार म्हणाले, दारुमध्ये सर्वाधिक नुकसान गरिब कुटुंबाचे होते.
>> रोज मजुरी करणारे कामगार आणि कर्मचारी, जी कमाई करतात ती दारुवर खर्च करतात. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक घडी विस्कळित होते.
>> दारुमुळे महिलांवर अत्याचार होतात. गरीब व्यक्ती देशी आणि इतर कमी प्रतीची दारु घेतात. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो आणि संपूर्ण कुटुंब उद्धवस्त होते.