आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही मत देत नाही मग वीज का द्यायची? बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा जनतेला सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात विविध पक्षांच्या नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा 'सिलसिला' सुरुच आहे. बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी जहानाबादमध्ये वीजकपातीच्या विरोधात आंदोलन करणा-या जनतेसमोर असेच एक वादग्रस्त विधान केले. तुम्ही आम्हाला मते देत नाहीत, मग तुम्हाला वीज का द्यायची? असे मांझी यांनी लोकांना विचारले आहे. मांझी म्हणाले, आम्ही तुमच्या मतांमुळे जिंकत नाही. जे तुमची सेवा करतात, त्यांना तुम्ही मत देत नाही. या वक्तव्याने मांझी यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.
विशेष म्हणजे, एनटीपीसी परक्का आणि कहलगावला जोडणा-या 400 केव्ही लाइनमध्ये काहीतरी बिघाड झाल्याने, पटना आणि सुपोल वगळता बिहारच्या सर्व जिल्ह्यांमध्ये वीजेची मोठ्या प्रमाणावर कपात केली जात आहे. भागलपूरमध्ये सबोर विभागाला गुरुवारी सकाळपासून केवळ 35 मेगावॅट वीजेचा पुरवठा केला जात आहे. अनेक जिलह्यांमध्ये 24 तासांपैकी दोन ते तीन तास वीज पुरवठा होत आहे. वीजेची समस्या असणा-या लोकांनी जहानाबादमध्ये मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नारेबाजी केल्याने ते नाराज झाले होते.