आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar Election: Alert In Bjp After Internal Survey Findings

बिहार: इंटरनल सर्व्हेने उडवली भाजपची झोप, टीम अमित शहा उतरली मैदानात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपची झोप उडाली आहे. बिहारमध्ये भाजपविरुद्ध जनता परिवार अशी लढत रंगाणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपने केलेल्या एका अंतर्गत सर्व्हेने भाजप नेतेच चिंतातूर दिसत आहेत. जातीय समीकरणाच्या आधारावर भाजपपेक्षा जनता परिवार जास्त सक्षम दिसत आहे. त्यामुळे जनता परिवाराशी दोन हात करण्यासाठी आता भाजपचे अध्यक्ष अमित शहा टीमला ग्राउंड झिरोवर काम करावे लागणार आहे.

समर्थक पक्ष 'टेंशन'मध्ये
एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बिहारमध्ये अंतर्गत सर्व्हेमध्ये भाजपला 127 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र,एनडीएचा समर्थक पक्ष राष्ट्रीय लोक समता पक्ष (आरएलएसपी) सर्व्हेत समोर आलेल्या आकडेवारीमुळे चिंतातूर दिसत आहे.

आरएलएससीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून बिहार निवडणुकीचे नेतृत्त्व करण्‍याचा आग्रह धरला आहे. बिहारमध्ये भाजपचे फिक्स्ड व्होटर नाहीत तसेच पक्षाकडे ओबीसी आणि मुस्लिम मते मिळवण्यासाठी प्रभावशाली नेता नसल्याचे आरएलएसपीच्या एका नेत्याने म्हटले आहे. दुसरीकडे, बिहारमध्ये लालूप्रसाद यादव आणि नीतीशकुमार यांच्या जनता परिवाराविरुद्ध एंटी इनकम्बेन्सी (सत्ताविरोधी) लाटेचा फायदा मिळेल, अशा भ्रमात भाजप आहे.

भाजपने कसली कंबर...
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली आहे. भाजप आता 15 दिवसांत एक सर्व्हे करणार आहे. राज्यातील प्रत्येक्ष विधानसभा मतदार संघाचा वेगवेगळा सर्व्ह आणि मतांचे गणित मांडण्यासाठी भाजपने चार-पाच विशेषतज्ज्ञांची एका टीम तयार केली आहे. ही टीम सरळ पक्षश्रेष्ठींना रिपोर्टिंग करावे लागणार आहे. विशेष म्हणजे ही टीम स्वतंत्र काम करेल. सर्व्हेतील आकडेवारी प्रदेशशाखेलाही शेअर केली जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय बिहार बाहेर आणखी एक गैर राजकीय विशेषतज्ज्ञांची टीम सर्व्हे करेल. 100 लोकांची ही साखळी असेल. पक्षासाठी उत्कृष्ट उमेदवार शोधण्याचीही जबाबदारी या टीमवर असेल. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे पॉवर पॉइंट प्रेजेंटेशनच्या माध्यमातून नियमित अहवाल सादर करण्यात येणार आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, बिहारमध्ये भाजपची अडचण वाढली...