आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar Election Fallout : Every Party Needs Prashant Kishor

यूपीमध्‍ये काँग्रेससाठी काम करू शकतात प्रशांत किशोर, 2019 वरही नजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयू प्रणित महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्‍यानंतर चर्चेत आलेले प्रशांत किशोर हे आता काँग्रेसच्या संपर्कात असून, आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीत ते काँग्रेसच्या प्रसार, प्रचाराची धुरा सांभाळू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. प्रशांत यांचे निकटवर्तीय असलेल्‍या काँग्रेसच्या एका नेत्याने या बाबीला दुजोरा दिला आहे. वर्ष 2014 मध्‍ये झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत प्रशांत यांनी नरेंद्र मोदी यांच्‍या प्रसिद्धीचे काम केले होते.
लोकसभा निवडणुकीच्‍या वेळी काँग्रेसने नाकारला होता प्रस्ताव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत प्रसिद्धीसाठी प्रशांत भूषण यांनी मदत घेतली होती. दरम्‍यान, प्रशांत यांनी त्‍या आधी त्या आधी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल यांची भेट घेतली होती. पण, त्यांना प्रशांत यांचा प्लॅन आवडला नाही. नंतर प्रशांत गुजरात निवडणुकी आधी मोदींकडे गेले आणि त्यांनी तिथे जे केले तो इतिहास आता सर्वांसमोर आहे.
प्रशांत यांच्‍या पुढे हे आहेत पर्याय
> बिहार निवडणुकीत महाआघाडीला विजय मिळवून देणारे प्रशांत भूषण हे सध्‍या पाटण्‍यातच आहेत. दोन दिवसांपूर्वी छट पूजेच्‍या कार्यक्रमात गंगाघाटावर ते नीतीश कुमार यांच्‍यासोबत दिसले.
> प्रशांत कुमार यांनी कायम आपल्‍यासोबत राहावे, यासाठी नितीशकुमार त्‍यांना राज्‍यसभेवर घेऊ शकतात, अशीही चर्चा आहे. मात्र, प्रशांत यांनी त्‍यांचा प्रस्‍ताव फेटाळल्‍याची माहिती आहे. पण, तरीही ते वर्ष 2019 मध्‍ये बिहार निवडणुकीत महाघाडीचा प्रचार करू शकतात.
> पश्चिम बंगालच्‍या मुख्यमंत्री ममता बनर्जीसुद्धा त्‍यांच्‍यासोबत संपर्क ठेवून आहेत.
> पश्चिम बंगालमध्‍ये वर्ष 2016 मध्‍ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत यांनी 'टीएमसी'चे प्रसिद्धी धोरण आखावे, अशी ममता यांची इच्‍छा आहे.
कोण आहेत प्रशांत किशोर ?
प्रशांत किशोर हे राजकीय पक्षांसाठी निवडणूक प्रचार आणि स्ट्रॅटेजी मॅनेजमेंटचे काम करतात. भारतासाठी हे नवीन आहे. मात्र, अनेक देशांमध्ये अशा पद्धतीने निवडणुकीत याचा वापर होत आला आहे. 37 वर्षांचे प्रशांत किशोर याआधी संयुक्त राष्ट्रात जॉब करत होते. भारतात त्यांना 3 डी रॅली आणि डिजिटल कँपनेसाठी ओळखले जाते. त्यांची 300 जणांची टीम आहे. या टीममध्ये आयआयटी आणि आयआयएममधून पासआऊट झालेले प्रोफेशनल्स आहे.
पुढील स्‍लाइड्सरवर वाचा, कसे भाजपपासून तुटत गेले प्रशांत किशोर