आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्ये रालोआच्या प्रचाराला गुरूवारपासून सुरुवात: मोदींच्या १५-२० सभा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली-देशाचे लक्ष लागलेल्या आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आपल्या प्रचार मोहिमेस गुरूवारपासून सुरूवात करणार आहे. प्रचाराची ही आैपचारिक सुरूवात असेल. त्यानिमित्ताने परिवर्तन रथ निघणार आहेत.

लालू-नितीश यांना टक्कर देण्यासाठी भाजप आघाडीने रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. लोकजनशक्ती पार्टी, आरएलएसपी, माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी देखील रथ यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. केंद्र सरकारने सुरू केलेल्या सामाजिक कल्याणाच्या योजनांना जनतेपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात येणार आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस भुपेंद्र यादव म्हणाले, अनेक रथ वेगवेगळ्या गावात जातील. तेथे लोकांशी संवाद साधतील. भाजपने राज्यात नवीन ८० लाख सदस्य नोंदणी केली आहे. त्याचाही यात्रा आणि सभांसाठी उपयोग होणार आहे. गरीबांसाठी मोदी सरकार करत असलेली कामे आणि नितीश कुमार यांचे लोकविरोधी प्रशासन या दोन्ही गोष्टींवर प्रचार मोहिमेत भर दिला जाईल.
१६० रथ जाणार गावागावांत
एनडीएच्या प्रचारासाठी १६० रथ तयार करण्यात आले असून ते बिहारमधील गावागावांत पोहचतील. दररोज १० गावांना भेटी देण्याची योजना आहे. त्याचबरोबर भाजपने प्रचार मोहिमेत सुमारे ३० हजार सभा घेण्याचा निर्धार केला आहे.

मोदींच्या १५-२० सभा
२५ जुलैपासून जाहीर सभा होतील. त्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किमान १५ ते २० सभा होतील.
बातम्या आणखी आहेत...