आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar Loksabha Election Change The Pattern Of Politics

लालूच्या पक्षात मोठी फूट, 22 पैकी 13 आमदार नितीशकुमारच्या साथीला?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बिहारमधील राजकारणाला आता एक नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या तोंडावरच लालूप्रसाद यादव यांच्या पक्षात मोठी फूट पडली आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या 13 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना एक पत्र लिहून आपण पक्ष सोडत असल्याचेे सांगितले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व 13 आमदार मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयूमध्ये सहभागी होणार आहेत. याबाबत सांगितले जात आहे की, यातील बहुतेक आमदार लोकसभा निवडणूक लढविण्याचा विचार करीत आहेत. लालूप्रसाद यादव यांनी यावर मोजकी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मी हे ऐकले आहे पण सगळे खरे नाही. मी याबाबत आता माहिती घेत आहे.