आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी पत्नी अॅग्रेसिव्ह, सुसाइडआधी IAS मुकेश पांडेंनी शेअर केला होता व्हिडिओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत्यूआधी बक्सर येथे मुकेश पांडे यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला. - Divya Marathi
मृत्यूआधी बक्सर येथे मुकेश पांडे यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला.
नवी दिल्ली - बिहारमधील बक्सरचे जिल्हाधिकारी मुकेश पांडे (30) यांनी गुरुवारी रात्री रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केली. आता त्यांचा आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात त्यांनी पत्नी आणि आई-वडिलांच्या भांडणामुळे वैतागलो असल्याचे म्हटले आहे. 
 
काय आहे व्हिडिओमध्ये...
- मुकेश पांडे यांनी आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ तयार केला होता. तो आता उघड झाला आहे. त्यामध्ये मुकेश यांनी मी आयुष्याला कंटाळलो असल्याचे म्हटले आहे. 
- व्हिडिओमध्ये मुकेश स्वतःची, आई-वडील आणि सासू-सासरे यांची माहिती देतात. 
- बक्सर सर्किट हाऊसमध्ये त्यांनी हा व्हिडिओ शुट केला होता. त्यात ते म्हणाले की हा माझा अखेरचा संदेश असून तो मी प्री रेकॉर्ड करुन ठेवत आहे. मी आत्महत्येचा निर्णय केला असून दिल्लीला जाऊन जीवन संपवणार आहे.
- त्यात त्यांनी सांगितले की माझी पत्नी आयुषी शांडिल्य आणि माझे आई-वडील गीता सिद्धेश्वर पांडे यांच्यात नेहमी वाद होत असतात. मी माझ्या आयुष्यात जराही आनंदी नाही. 
- पत्नी आणि आई-वडील नेहमी भांडत असतात. त्यामुळे माझे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. 
- मुकेश यांनी या व्हिडिओमध्ये हेही सांगितले आहे, की दोघेही (पत्नी आणि आई-वडील) माझ्यावर खूप प्रेम करतात हे मला माहित आहे. 
- मात्र कधी-कधी कोणतीही गोष्ट अती झाली की माणसाला एक्स्ट्रिम स्टेप घ्यावी लागते. कोणत्याही गोष्टीची अती चांगली नाही. 
- माझ्या पत्नीचे माझ्यावर प्रेम आहे. मला एक लहान मुलगी आहे. आता माझ्याकडे कोणताही पर्याय शिल्लक नाही आणि तसाही या आयुष्याला मी कंटाळलो आहे. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मुकेश पांडे यांचा व्हिडिओ...
 
हेही वाचा..
बातम्या आणखी आहेत...