नवी दिल्ली - दिल्लीत आयोजित बिहार सन्मान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या महिलांच्या अंगावर जर काळी ओढणी असेल तर त्यांना ती काढण्यास सांगण्यात आले आहे. याचा महिलांनी विरोध केला आहे. दिल्ली सरकारच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार सहभागी होत आहेत.
काळ्या ओढणीला नकार का ?
महिलांच्या अंगावर जर काळी ओढणी असेल तर ती काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आयोजकांनी ही काळजी घेतली आहे. याआधी झालेल्या बिहार सन्मान कार्यक्रमात नितीशकुमारांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते, यामुळे ही खबरदारी घेतली जात आहे. मात्र, या अतिदक्षतेमुळे महिलांचा अपमान होत असल्याकडे आयोजक दुर्लक्ष करत आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधीत छायाचित्रे