आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार टॉपर्स घोटाळा : माजी बोर्ड अध्यक्षाच्या जावयाने 'छापले' ३ कोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहार बोर्डाच्या इंटर बोर्डच्या परीक्षेतील कागदपत्रांच्या छपाईचे टेंडर देऊन माजी अध्यक्ष लालकेश्वर याचा जावई विवेक कुमार याने कोट्यवधींची अफरातफर केली असल्याचे एसआयटी तपासात उघडकीस आले आहे. तीन वर्षांत १२ कोटी रुपयांचे टेंडर मॅनेज करून विवेकने २५ टक्के हिशेबाने ३ कोटी रुपयांचे कमिशन “छापले’ आहे. याप्रकरणी एसआयटी सखोल चौकशी करत आहे.

बोर्डाच्या विविध कामकाजांमध्ये लागणाऱ्या कागदपत्रांची छपाई करण्यासाठी ४ कोटी रुपयांचे टेंडर काढले जाते. सर्वाधिक दराने टेंडर भरल्यानंतरही उत्तर प्रदेशातील “मथुरा प्रिंटिंग प्रेस’ला विवेकने मध्यस्थी करून ठेका मिळवून दिला. कागदपत्रांची प्रक्रिया कोलकातामध्ये, तर छपाई मथुरेत होत होती. त्याबाबत अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. सूत्रांनुसार मथुरा प्रिंटिंग प्रेसच्या मालकाने सांगितले की, त्याच्या कर्मचाऱ्यांनी करार केला होता. त्यानेच कराराच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. तथापि, एसआयटीने या सर्व गोष्टींची पडताळणी केली असता अनेक गैरव्यवहार दिसून येत आहेत. त्यात सर्वाधिक घोटाळे हे छपाईशी संबंधित आहेत. त्यामुळे एसआयटी त्यावर विश्वास ठेवायला तयार नाही.

नातेवाईक, पीएस माजी अध्यक्षाने वाटली कामे
लालकेश्वरने त्याचे नातेवाईक आणि पीएला या कामांची वाटणी केली होती. एसआयटी सूत्रांनुसार त्याचा जावाई विवेक हाच प्रिंटींगची सर्व कामे मूनेज करत होता. तो नातेवाईक व पीए विकास चंद्रच्या (मुलाचा मेहुणा) महाविद्यालयाला मान्यता देण्यासोबतच अनुदान मिळवून देण्याचेही काम बघत होता. डीलिंगसाठी विकानेच बच्चा रायला लाकेश्वरची पत्नी उषा सिन्हाकडे घेऊन जात असे. या शिवाय लालकेश्वरचा पीए चुन्नू, अनिल व इतर एजंट पीए चुन्नु, अनिल व इतर एजंट परीक्षेपासून निकालापर्यंतचे सेंटींग करत असे.

लालकेश्वरची पत्नी प्रो.उषा घोटाळ्यात
एसआयटीच्या तपासानुसार लालकेश्वरची पत्नी प्रो. उषा सिन्हाचा नालंदा घोटाळ्यात हात आहे. तिने एक किराणा दुकानदार प्रफुल्लला पहिल्यांदा शिक्षक म्हणून नेमले. नंतर त्याची नेमणूक करून त्याला एजंट बनवून घोटाळा करत असे. नोकरीचे आमिष दाखवून तो लाखो रुपयांना टीईटीच्या बनावट पदव्या वाटत असे. प्रफुल्लही सध्या फरार आहे. एसआयटी पुराव्याअभावी आरोपी सुटू नयेत, या दृष्टीने लालकेश्वर, प्रो. उषा, विवेक, व्ही.आर. कॉलेजचा संचालक बच्चा राय यांच्याविरोधात ठोस पुरावे गोळा करत आहे.

विवेक प्रेस मालकांच्या संपर्कात
दरम्यान, पाटलीपुत्र येथे विवेकच्या घरी सापडलेले खाते व इतर कागदपत्रांचा तपास सुरू अाहे. त्या शिवाय विवेकच्या मोबाइलचा सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) तपासला असता तो मथुरा प्रेसचे मालक व इतर कर्मचाऱ्यांच्या संपर्कात होता.तसेच लालकेश्वरच्या मोबाइलवरही तो दीर्घकाळ त्यांच्याशी बोलत असे. लालकेश्वरच जावई विवेक मगध विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रो. अरुणकुमारचा मुलगा असून सध्या तो फरार आहे.
बातम्या आणखी आहेत...