आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मस्तकावर लिहिले भूकंप, बिहारच्या दरभंगा मेडिकल काॅलेज हॉस्पिटलचा प्रताप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा/काठमांडू/नवी दिल्ली - नेपाळ नंतर भूकंपाचा सर्वाधिक फटका बसलेल्या बिहारमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अमानुषतेचे दर्शन घडले. दरभंगा जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींच्या मस्तकावर ‘भूकंप’ लिहिण्यात आले. एका जखमीने सांगितले की, शनिवारपासून उपचार सुरू होते. ६० लोक दाखल होते. ५० जणांना सोमवारपर्यंत सुटी मिळाली. मंगळवारी एक कर्मचारी आला आणि १० लोकांच्या कपाळावर एकेक चिठ्ठी डकवली. सरकार मोफत उपचार करेल. ओळख पटावी म्हणून चिठ्ठी डकवली जात आहे. रुग्णालय अधीक्षक डॉ. शंकर झा यांनी असे घडल्याचा इन्कार केला. मात्र, सायंकाळी मस्तकावरील चिठ्ठी हटवण्यात आली.