आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bilawal Bhutto News In Marathi, Pakistan, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानचा बिलावल भुत्तो दिवास्वप्न पाहणारा नेता, भारतीय मुस्लिम लीगची टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरची इंच-इंच भूमी परत मिळवण्याची भाषा करणारा पाकिस्तान मुस्लिम लीगचा नेता बिलावल भुत्तो दिवास्वप्न पाहत असल्याची टीका भारतीय मुस्लिम लीगने केली. भारताची इंच-इंच भूमी शेवटच्या क्षणापर्यंत लढवू, असा निर्धार लीगने व्यक्त केला.

बिलावलने भारताविरुद्ध भूमिका मांडताना काश्मीरवर हक्क सांगून आपणही अशी दिवास्वप्ने पाहणा-या पाकिस्तानी नेत्यांपैकी एक आहोत हेच दाखवून दिले असल्याचे मुस्लिम लीगचे अध्यक्ष व खासदार ई. अहमद यांनी म्हटले आहे. जम्मू-काश्मीर भारताचे अविभाज्य अंग असल्याचे सांगून देशातील १७ कोटी मुस्लिम या भूमीचे शेवटच्या क्षणापर्यंत रक्षण करतील, असे ते म्हणाले.शनिवारी बिलावलने मुलतानमध्ये पक्ष कार्यकर्त्यांसमोर बोलताना जम्मू-काश्मीर पाकिस्तानचे असल्याचा दावा करून या प्रदेशाची इंच-इंच भूमी परत मिळवू, अशी वल्गना केली होती. पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या दिवंगत नेत्या बेनझीर भुत्तो यांचा पुत्र असलेला बिलावर २०१८ मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत उतरणार आहे.