आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेट्स यांनी दान केले 29,500 कोटींचे शेअर; आतापर्यंत 2.25 लाख कोटी दान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असलेले बिल गेट्स यांनी आपल्या मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे ४.६ अब्ज डॉलरचे (२९,५०० कोटी रुपये) ६.४ कोटी शेअर दान केले आहेत. १७ वर्षांतील त्यांचे हे सर्वात मोठ्या रकमेचे दान ठरले. गेट्स यांनी जून महिन्यातच ही रक्कम दान केली आहे.

अमेरिकी शेअर बाजाराचे नियामक सेक्युरिटी अँड एक्स्चेंज कमिशनला देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता गेट्स यांच्याकडे मायक्रोसॉफ्टचे केवळ १.३ टक्के शेअर उरले आहेत. हे दान करण्यापूर्वी त्यांच्याकडे २.३ टक्के आणि १९९६ मध्ये २४ टक्के शेअर होते. गेट््स यांच्या ५.८ लाख कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीत मायक्रोसॉफ्टच्या शेअर्सची भागीदारी केवळ ८ टक्के राहिली आहे. मायक्रोसॉफ्टचे बाजार मूल्य ३६ लाख कोटी आहे. नियामकाला देण्यात आलेल्या माहितीत दान केलेले शेअर कुणाकुणाला देण्यात आले आहेत हे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
मात्र, असे मानले जाते की हे सर्व शेअर्स बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनलाच देण्यात आले आहेत. या शेअर दानामुळे बिल गेट््स या वर्षीचे सर्वात दानशूर व्यक्ती ठरले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर बर्कशायर हॅथवेचे वॉरेन बफेट आहेत. बफेट यांनी गेल्या महिन्यात बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनला आपल्या कंपनीचे २०,५०० कोटींचे शेअर्स दान केले होते. गेट््स यांनी सन २००० मध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओपद सोडल्यानंतर पत्नी मेलिंडासह सेवाभावी संस्थेची स्थापना केली होती. ही जगातील सर्वात मोठी खासगी संस्था आहे. ही दान स्वरूपातील रक्कम मिळण्यापूर्वी संस्थेकडे २.६ लाख कोटींचा निधी होता. ३ वर्षांत जग पोलिओमुक्त करण्याचे गेट्स फाऊंडेशनचे ध्येय आहे. या कार्याला मार्क झुकेरबर्ग, मायकेल ब्लूमबर्ग आणि जॉर्ज लुकास यांच्यासह जगातील १७० श्रीमंतांनी हातभार लावला आहे.
 
आतापर्यंत २.२५ लाख कोटी दान
१९७५मध्ये पॉल अॅलेन यांच्यासोबत मायक्रोसॉफ्ट कंपनी स्थापन करणारे बिल गेट्स यांनी अब्जावधी रुपये आजवर दान केले. तरीही ते जगात सर्वात श्रीमंत म्हणून कायम आहेत. सन १९९४ पासून आजवर बिल आणि मेलिंडा यांनी २.२५ लाख कोटींची संपत्ती दान केली. १९९९मध्ये त्यांनी १ लाख कोटींचे शेअर्स दान केले होते. त्यानंतर २००० मध्ये ३२,००० कोटी गेट्स फाउंडेशनला दिले. दरम्यान, गेट्स यांनी मंगळवारी ब्लॉगवर मॉस्किटो नेट (मच्छरदाणी) पुढाकाराची घोषणा केली होती. यातून मलेरिया रोखण्यासाठी कार्य होईल.
बातम्या आणखी आहेत...