आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Billionair Bhardwaja Killing Contract Give By His Sun

अब्जाधीश भारद्वाज यांच्या हत्येची मुलानेच दिली सुपारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशाला हादरवून टाकणा-या दिल्लीतील अब्जाधीशाच्या हत्येचे गूढ उकलले आहे. बसपाचे नेते दीपक भारद्वाज यांच्या हत्येमागे त्यांच्या धाकट्या मुलाचा हात असावा, असा पोलिसांचा संशय असून त्याला मंगळवारी अटक करण्यात आली आहे.


नितेश असे भारद्वाज यांच्या धाकट्या मुलाचे नाव आहे. नितेश (31) याने वकील बलजित सिंग शेरावत (51) याच्यासोबत हा कट केला. त्यात स्वामी प्रतिभानंदचाही समावेश असावा, असे पोलिसांना वाटते. नितेशसोबत शेरावत यालाही अटक करण्यात आली आहे. हत्येच्या घटनेतील शूटर्स पुरुषोत्तम राणा आणि सुनील मन यांना अगोदरच अटक झाली आहे. त्यांचे राकेश आणि अमित नावाच्या साथीदारांनाही अटक झाली. पोलिसांनी या घटनेत देशी बनावटीच्या दोन पिस्तूल, 30 लाख रुपये आणि तीन कार जप्त केल्या आहेत. शेरावत वकील असला तरी व्यवसायाने प्रॉपर्टी डीलर म्हणून भारद्वाज आणि नितेश सोबत काम केले होते. शेरावतला निवडणूक लढवण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने भारद्वाज यांचा काटा काढण्याची तयारी दर्शवली परंतु त्यासाठी नितेशकडे निवडणुकीचा खर्च उचलण्याची मागणी केली होती. जानेवारीत शेरावतचे मन बदलले. त्याने भारद्वाज यांच्या हत्येसाठी 5 कोटी रुपयांची मागणी केली होती. या हत्याकांडात भारद्वाज यांच्या थोरल्या मुलाचाही हात आहे का, याचाही तपास करण्यात येत असल्याचे पोलिस उपायुक्त छाया शर्मा यांनी सांगितले.


अपमानाचा सूड
नितेशला वडिलांचा सूड घेण्याची इच्छा होती. त्यातूनच ही हत्या झाली असे सांगण्यात येते. फार्महाऊसमध्ये येण्यास दीपक भारद्वाज यांनी नितेशला मनाई केली होती. या फार्म हाऊसमध्ये दीपक राहत होते. त्याचबरोबर त्याला संपत्तीमधील योग्य वाटाही हवा होता. तोदेखील भारद्वाज यांच्याकडून मिळत नव्हता. नितेश आणि दीपक भारद्वाज यांचे पटत नव्हते. त्यामुळे नितेश अनेक वर्षांपासून कुटुंबापासून दूर राहत होता. संपत्तीतून डावलल्याने नितेशची नाराजी आणखीनच वाढली होती.


600 कोटींचा मालक
दीपक भारद्वाज यांनी 2009 मध्ये बसपाकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी आपली संपत्ती 600 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते.


नेमके काय घडले ?
दिल्लीतील राजाक्री भागातील फार्म हाऊसवर
26 मार्च रोजी भारद्वाज यांची हत्या करण्यात आली होती. काही हल्लेखोरांनी त्यांच्या फार्महाऊसमध्ये कारने प्रवेश करून त्यांच्यावर गोळी झाडली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला.


दोन दिवस अगोदर दिल्ली सोडली
प्रतिभानंद दिल्लीत योगा टिचर म्हणून दाखल झाले होते, परंतु भारद्वाज यांच्या हत्येच्या दोन दिवस अगोदरच त्यांनी दिल्लीतून पळ काढला. 25 ते 30 मार्च या काळात ते हरिद्वारमध्ये होते. 30 रोजी त्यांनी इंदुरमधील मित्र अवनीश शास्त्री यांची भेट घेतली होती. पोलिसांनी शास्त्री यांची चौकशी केली, परंतु हत्याकांडात त्यांची काही भूमिका नव्हती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. प्रतिभानंदच्या बँकेतील खात्यांची तपासणी पोलिसांनी केली आहे. त्यात फार पैसा दिसून आला नाही, परंतु सहा महिन्यांपूर्वी त्यांनी पासपोर्ट पडताळणीसाठी अर्ज केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.


प्रतिभानंदांना हवा होता आश्रमासाठी पैसा
प्रॉपर्टी डीलर असलेल्या बलजित सिंग शेरावत हा प्रतिभानंद यांच्या संपर्कात होता. तो नेहमीच प्रतिभानंद यांच्यासोबत चर्चा करत असे. तो प्रतिभानंद यांच्याकडे राहिलादेखील होता. त्याच काळात आश्रमासाठी प्रतिभानंद यांना पैशांची गरज होती. त्यानंतर त्यांचा चालक राणा आणि त्याचा साथीदार मन यांनी हत्या घडवून आणली. नितेशने 50 लाख रुपये शेरावतला अ‍ॅडव्हान्स दिले होते. त्यातील 3-4 लाख रुपये प्रतिभानंद यांना मिळाले.