आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिन्नी यांना नोटीस; \'प्रश्न उपस्थित केल्याने शिस्तभंग होत असेल तर शंभर वेळा करणार\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे आमदार विनोदकुमार बिन्नी यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर पक्षाने आमदार बिन्नी यांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांना कारणे दाखवा नोटीस बाजवली आहे. आपचे प्रवक्ते योगेंद्र यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन 'आप'मध्ये पक्षशिस्तीला अतिशय महत्त्व असल्याचे सांगितले. आपच्या या पवित्र्यावर आमदार बिन्नी म्हणाले, जर प्रश्न विचारल्याने पक्षशिस्तीचा भंग होत असेल तर, मी शंभर वेळा असे करेल.
आमदार बिन्नी यांच्या पत्रकार परिषदेनंतर योगेंद्र यादव यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, बिन्नी भारतीय जनता पक्षाची भाषा बोलत आहे. त्यांनी लोकसभेचे तिकीट मागितले होते. पक्षाने ते नाकारले आहे. त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीने राग व्यक्त केला आहे. तसेच यादव यांनी बिन्नी यांच्या पत्रकार परिषद घेण्यावरही नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, अशा पद्धतीने माध्यमांमध्ये प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा पक्षाच्या बैठकीत याची चर्चा करायला पाहिजे होती. यादव यांना शीला दीक्षित यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची अजून चौकशी का सुरु झाली नाही, असे विचारले असता ते म्हणाले, 'दिल्लीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याच्या चौकशीसाठी एक विशिष्ट प्रक्रिया सुरु करावी लागणार आहे. फक्त एका व्यक्तीची चौकशी होणार नाही. तसे केले तर तुम्हीच (माध्यमे) आमच्या मागे लागाल.'
याआधी लक्ष्मी नगरचे आमदार विनोदकुमार बिन्नी यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन केजरीवाल यांच्यावर वैयक्तिक आरोप केले.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय म्हणाले बिन्नी