आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Biogus Car News In Marathi, Renewable Engergy Ministry, Divya Marathi

बायोगॅसवर धावणा-या देशातील पहिल्या कारची यशस्वी चाचणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अपारंपरिक ऊर्जा मंत्रालय आणि आयआयटी दिल्लीकडून नुकतीच कम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी)वर चालणा-या देशातील पहिल्या कारची चाचणी घेण्यात आली. सीबीजीवर ही कार सुमारे 15 हजार किलोमीटर अंतर धावली. त्यामुळे आता पारंपरिक इंधनावर अवलंबून राहावे लागणार नाही.


दिल्ली आयआयटीने भिलवाड येथे प्रायोगिक तत्त्वावरील बायोगॅस संयंत्राची स्थापना केली आहे. तसेच एक अपग्रेडिंग सिस्टिमही स्थापन केले आहे. या गॅसचा वापर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि इंधन म्हणूनही केला जाईल. त्यासाठी याचा पेटंटही करून घेण्यात आला आहे.


प्रक्रियेंतर्गत एका दिवसात 500 घनमीटरपेक्षा अधिक बायोगॅस तयार करता येऊ शकतो. हे
यंत्र एका दिवसात 200 किलो सीबीजी उत्पादन करेल. याचा वापर एलपीजीच्या पर्यायाच्या रूपात केला जाऊ शकतो. यासाठी ग्राहकांना प्रतिकिलोग्रॅम 70 रुपये खर्च करावा लागेल. सीबीजीचा वापर करण्यासाठी कारमध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही.ऊर्जा बचत व जल-वायू परिवर्तन रोखण्यासाठी सध्या नवीकरणक्षम स्रोतांची आवश्यकता आहे.