आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी मीडियाकडून भारतीय लष्कर प्रमुखांचा अवमान, रावत यांना म्हणाले वाचाळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या वक्त्यव्यावरुन चिनी मीडियाने त्यांना लक्ष केले. - Divya Marathi
भारतीय लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या वक्त्यव्यावरुन चिनी मीडियाने त्यांना लक्ष केले.
बीजिंग/नवी दिल्ली - चिनी मीडियाने भारतीय लष्कर प्रमुखांचे नाव घेऊन त्यांचा अवमान केला आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या अग्रलेखात म्हटले आहे, 'जनरल रावत यांच्या वाचाळपणामुळे बीजिंग आणि दिल्लीत शत्रुत्वाचे वातावरण निर्माण होत आहे. रावत यांचा अहंकार भारताची प्रतिमा खराब करत आहे.' 
 
काय म्हणाले होते रावत 
- भारतीय लष्कर प्रमुख जनरल रावत बुधवारी म्हणाले होते, की भारताला दोन मोर्चांवर लढण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. चीनवर आरोप करताना ते म्हणाले होते, की चीनला भारताचे तुकडे करायचे (salami slicing) आहे. 
- दिल्लीत बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात भाषण करताना रावत म्हणाले होते, चीन हळुहळु आपल्या सीमेजवल येण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्याकडून जोर दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. पाकिस्तान नॉर्दन सीमेवर होणाऱ्या मतभेदांचा फायदा उचलण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आम्हाला दोन्ही आघाड्यांवर युद्धासाठी तयार राहिले पाहिजे. 
- रावत म्हणाले - टकराव एखाद्या खास जागेवर किंवा ठिकाण्यापर्यंत मर्यादीत राहाण्याची शक्यता आहे. मात्र, हे युद्धात बदलण्याची शक्यता आहे. कारण नॉर्दन बॉर्डरवर निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा फायदा वेस्टर्न बॉर्डरवर उचलण्याचे षडयंत्र चालू आहे. 
 
ग्लोबल टाइम्सने गुरुवारी लिहिले, 'रावत यांनी आंतरराष्ट्रीय नियमांकडे डोळेझाक केली आहे, एवढेच नाही तर अशी परिस्थिती निर्माण केली आहे की चीनला भारतीय लष्कराचा इगो दिसायला लागला आहे. रावत यांनी फारच हायप्रोफाइल पद्धतीने दोन मोर्चांवर लढावे लागणार असल्याचा दावा केला आहे, मात्र भारतीय आर्मीत एवढा विश्वास कुठून आला आहे?'
- चीन आणि भारतादरम्यान सिक्कीममधील डोकलाम भागावरुन गेल्या दोन महिन्यांपासून तणाव सुरु होता. 73 दिवस दोन्ही देशांचे सैन्य डोकलाममध्ये आमने-सामने होते. या दरम्यान चीनी मीडियाने भारताविरोधात बरेचदा लिखान केले होते. आता त्यांनी जनरल रावत यांच्या वक्तव्यावरुन त्यांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे.
 
 चीन सरकारनेही व्यक्त केली नाराजी
 - रावत यांच्या वक्तव्यावर चीन सरकारनेही नाराजी व्यक्त केली होती. चीनचे परराष्ट मंत्री वांग यी म्हणाले होते, 'दोन्ही देशांचा आपल्या मानसिकतेत बदल करण्याची गरज आहे. आम्ही एकमेकांचे शत्रू होऊ शकत नाही. दोन्ही देशांनी लक्षात घेतले पाहिजे की मतभेद आहेत ते जास्त ताणले जाऊ नये.' 
 - दुसरीकडे, चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या गेंग शुआंग म्हणाल्या होत्या, 'रावत यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची गरज होती, त्यांनी म्हटले होते, दोन्ही देशांनी विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आले पाहिजे आणि मतभेद सोडले पाहिजे.' 
- त्या आणखी म्हणाल्या होत्या, 'आम्हाला कल्पना नाही हे वक्तव्य रावत यांचे आहे की भारत सरकारचे. आम्ही भारतीय माध्यमांमध्ये आलेल्या काही वृत्तांची माहिती घेतली आहे. मात्र आम्हाला कल्पना नाही की अशा प्रकारचे वक्तव्य करण्याचा त्यांना अधिकार आहे की नाही.'
 
बातम्या आणखी आहेत...