आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: या चित्रकाराने हिंदूंना करून दिले देवतांचे दर्शन, आज आहे त्यांचा जन्मदिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय चित्रकारांत नेहमीच आदराने नाव घेतले जाणारे ज्येष्ठ चित्रकार म्हणजे राजा रविवर्मा. केरळच्या त्रावणकोर राजघराण्यातील कोईलथंपुरन येथील किलीमनुर राजवाड्यात 29 एप्रिल 1848 रोजी त्यांचा जन्म झाला. आई कवियित्री, वडील विद्वान काका चित्रकार त्यामुळे बालपणीच कलेची बिजे त्यांच्यात रोवली गेली. सन 1873 मध्ये व्हिएन्ना येथे भरलेल्या चित्रप्रदर्शनात त्यांच्या चित्राला प्रथम पुरस्कार मिळाला आणि ते प्रकाशझोतात आले. आधुनिक भारतीय वास्तववादी चित्रकलेचे जनक म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. विश्वामित्र-मेनका, उर्वशी-पुरुरवा, दुष्यंत-शंकुतला, नल-दमयंती या चित्रांनी त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. त्यांच्या चित्रांवर जरी पाश्चात्त्य चित्रकारांचा प्रभाव असला तरी चित्रे मात्र अस्सल भारतीय परंपरेतीलच आहेत. आपली चित्रे छापण्यासाठी त्यांनी लोणावळ्याजवळील मळवली येथे छापखाना उभारला होता. याच छापखान्यातून हजारो देवदेवतांची चित्रे भारतभर पुरवली गेली. देवतांना मानवी चेहरे देण्याचे काम राजा रविवर्मा यांनी केले. 1993 पासून केरळ राज्याने त्यांचा नावाचा पुरस्कारही सुरू केला आहे. 2 आॅक्टोबर 1906 मध्ये वयाच्या 58 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
पुढील स्लाईडवर पाहा, राजा रवी वर्मा यांची निवडक चित्रे...