आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: पाहा, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची दुर्मिळ छायाचित्रे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - राजीव आणि सोनिया गांधी )
राजीव गांधी यांना देशाचे 'माहिती क्रांतीचे जनक' म्‍हटल्‍या जाते. आधुनिक विचार आणि कठोर निर्णयामुळे राजीव यांनी जागतिक राजकारणामध्‍ये देशाची वेगळीच ओळख निर्माण केली. त्‍यांची आज 70 वी जयंती आहे. 20 ऑगस्‍ट 1944 रोजी त्‍यांचा जन्‍म झाला होता.
राजीव यांना जन्‍मजातच राजकीय शिक्षण मिळाले होते. परंतु ते यापासून दुर राहण्‍याचा प्रयत्‍न करत. त्‍यांना पायलट म्‍हणून करिअ करायचे होते. यासाठीच उच्‍चशिक्षणासाठी ते लंडनना गेले होते. ट्रिनिटी कॉलेजमध्‍ये त्‍यांनी प्रवेश घेतला होता. त्‍यांनतर त्‍यांनी इम्‍पीरिअल कॉलेजमध्‍ये प्रवेश घेतला. परंतु दोन्‍ही शिक्षणाची त्‍यांनी पदवी घेतली नाही. अर्ध्‍यावरच शिक्षण सोडून दिले.
लंडनमध्‍ये झाली होती राजीव-सोनियाची भेट
1965 मध्‍ये राजीव आणि सोनियाची लंडन येथे भेट झाली होती. सोनिया त्‍यावेळी लंडनच्‍या एका रेस्‍टॉरंटमध्‍ये पार्ट टाईम वेटर्सचे काम करत होती. त्‍या रेस्‍टारंटमध्‍ये सोनियांना पाहताच राजीव त्‍यांच्‍या प्रेमात पडले.
3 वर्ष डेटिंग केल्‍यानंर 1968 मध्‍ये राजीव आणि सोनिया यांनी लग्‍न केले. हे लग्‍न अमिताभ बच्‍चन यांच्‍या घरी झाल्‍याचेही बोलले जाते. कारण अमिताभची आई आणि इंदिरा गांधी दोघी चांगल्‍या मैत्रीणी होत्‍या.
सोनियांचे पूर्वीचे नाव (एंटानियो एडविग एलबिना माइनो Antonia Edvige Albina Maino) असे होते. आजही देशाच्‍या सर्वात शक्‍तीशाली महिलेमध्‍ये त्‍यांची गणना होते.
1984 मध्‍ये राजीव गांधीच्‍या हत्‍येनंतर कॉंग्रेसची धुरा सोनिया गांधीकडे आली.
राजकारणामध्‍ये येण्‍यापूर्वी राजीव गांधी पायलट होते. आपल्‍या कामामुळे भलेही त्‍यांना परिवारापासून दुर राहावे लागले असले तरी ते परिवारासोबत असताना सर्वांमध्‍ये खुशीचे वातावरण असायचे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, राजीव आणि त्‍यांच्‍या परिवाराची काही खास निवडक छायाचित्रे..