आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलामचाचांची कहाणीः वृत्तपत्र विकताना पाहिले पायलट होण्‍याचे स्‍वप्‍न, झाले \'मिसाईल मॅन\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी राष्‍ट्रपती आणि 'मिसाईलमॅन ऑफ इंडिया' म्‍हणून ओळखले जाणारे डॉ. अब्‍दुल कलाम यांनी एक वेगळेच स्‍वप्‍न उराशी बाळगले होते. त्‍यांना मिसाईल मॅन नव्‍हे, तर वायुसेनेत वैमानिक व्‍हायचे होते. अगदी थोडक्‍यात त्‍यांचे हे स्‍वप्‍न पूर्ण होता होता राहिले. त्‍यावेळेस वायुसेनेत 8 जागांची भरती करायची होती आणि कलाम यांना नववे स्‍थान मिळाले होते. हा खुलासा कलाम यांनी 'माय जर्नी ट्रांसफॉर्मिंग ड्रीम्‍स इन टू ऍक्‍शन्‍स' या नव्‍या पुस्‍तकात केला होता.
आयुष्‍यात छोटी स्‍वप्‍ने पाहणे पापच असल्‍याचे कलाम सांगतात. मोठी स्‍वप्‍ने बाळगा आणि ती पूर्ण करण्‍यासाठी प्रयत्‍न करा, असे अनेकदा त्‍यांनी तरुणांना आणि लहान मुलांना सांगितले आहे. मात्र, स्‍वतःच्‍या एका स्‍वप्‍नाबद्दल त्‍यांनी पुस्‍तकातून खुलासा केला. कलाम यांनी आपल्‍या स्‍वप्‍नाबाबत लिहिले, की ते वैमानिक होण्‍यासाठी खूप आतूर होते. कलाम यांनी मद्रास आयआयटीमधून एरोनॉटीकल इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले होते. त्‍यानंतर त्‍यांनी वैमानिक होण्‍यासाठी प्रयत्‍न सुरु केले. स्‍वप्‍नाच्‍या जवळ ते पोहोचलेही होते. परंतु, थोडक्‍यात त्‍यांच्‍या हातून संधी निसटली.

कशामुळे भंगले कलाम यांचे स्‍वप्‍न? वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये...