आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BIT System, Micro Control Development News In Marathi

संवेदनशील ठिकाणी वाहनाची गती मंदावेल; विद्यार्थ्यांनी विकसित केले नवे तंत्रज्ञान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भरधाव वाहनांना नियंत्रित करण्यासाठी तामिळनाडूच्या बन्नारी अमान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (बीआयटी) च्या विद्यार्थ्यांनी मायक्रो कंट्रोलरचा उपयोग करून एक नवी प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे शाळा, महाविद्यालय, रुग्णालय आदी ठिकाणी वाहनांचा वेग कमी करण्यास मदत होईल. बीआयटीचा आर. सुहदेव व्यंकटेश आणि त्याच्या चार सहकार्‍यांनी मिळून हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यांच्या मते, कारचा वेग कमी करण्यासाठी फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनचा वापर करता येऊ शकतो.

असे आहे तंत्रज्ञान
व्यंकटेश आणि त्याच्या सहकार्‍यांनी निंबस यंग इन्नोव्हेटर पुरस्कार सोहळ्यात भाग घेतला. या वेळी त्यांनी सांगितले की, या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होण्यासाठी शाळा, रुग्णालयांत लावलेल्या ट्रान्समीटरद्वारा वाहनात लावण्यात आलेल्या रिसिव्हर युनिटला एक संदेश जाईल. सिग्नल मिळताच हे युनिट मायक्रो कंट्रोलरला सक्रिय करेल. त्यामुळे वाहनाचा वेग आपोआप कमी होऊन जाईल.

हायड्रोजनने चालणार इंजिन
क्रेसेंडोच्या एका चमूने हायड्रोजनने चालणारे इंजिन तयार केले आहे. या इंजिनमध्ये हायड्रोजनचा वापर प्रथम इंधनाच्या स्वरूपात तसेच पेट्रोल किंवा डिझेलच्या पर्यायाच्या स्वरूपात केला जातो. पेट्रोल किंवा डिझेलपैकी कोणतेही एक इंधन नसले तरी हे इंजिन केवळ हायड्रोजनच्या मदतीने चालेल. मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष ध्रुव नाथ यांच्या मते, सध्याच्या काळात अशा प्रकारचे तंत्रज्ञान खूप प्रभावी ठरू शकते. कारण लोक गरजेपेक्षा जास्त इंधन खर्च करत आहेत आणि हा खर्च कमी करू शकणारा एकही उपाय त्यांच्याकडे नाही.