आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोडसेने गांधींना, तर भाजपने अण्णांना जिवंतपणीच मारले- केजरीवालांची टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - भाजपने प्रकाशित केलेली जाहिरात.
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या नव्या रणनीतीनुसार अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजपने जाहिरातीतून हल्ला चढवला आहे. या जाहिरातीत अण्णांच्या फोटोला हार अर्पण केलेले दाखवण्यात आले आहे. त्यामुळे भडकलेल्या केजरीवाल यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली होती. पण भाजपने तर अण्णांना जिवंतपणीच मारले असल्याचे केजरीवाल यांनी या जाहिरातीबाबत बोलताना म्हटले आहे.
भाजपने दिल्लीतील बड्या वृत्तपत्रांमध्ये एक जाहिरात प्रकाशित केली आहे. त्यात केजरीवाल यांचे एक कार्टून असून, त्यांची पत्नी काँग्रेस असल्याचे दाखवले आहे. जाहिरातीत केजरीवाल त्यांच्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेत असल्याचेही दाखवले आहे. तसेच भिंतीवर एका छायाचित्रात अण्णा हजारे दाखवण्यात आले असून त्यांच्या फोटोवर पुष्पहार अर्पण केल्याचेही दाखवण्यात आले आहे.
जाहिरातीमध्ये भाजपचे बहुमतातील सरकार यावे यासाठी लोकांना आव्हान करण्यात आले असले तरी थेट केजरीवाल यांना लक्ष्य केल्याचे स्पष्ट जाणवत आहे. जाहिरातीत सत्तेसाठी आपण मुलांच्या खोट्या शपथा खाण्यास तयार आहे, असे केजरीवाल म्हणत असल्याचे यात दाखवले आहे. 2013 च्या निवडणुकांपूर्वी या महाशयांनी काँग्रेस किंवा भाजपशी हातमिळवणी करणार नाही असे सांगत मुलांची शपथ घेतली होती. पण 15 दिवसांच्या आत सत्तेसाठी ज्या जावयावर आरोप केले होते, त्याच्याच सासूच्या पक्षाशी हातमिळवणी केली असाही उल्लेख या जाहिरातीत आहे.

भाजपाध्यक्ष अमित शहा निवडणुकांमध्ये अत्यंत गांभीर्याने लक्ष देत आहेत. त्याचसंदर्भात त्यांनी गुरुवारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा केली. त्यात नव्याने रुपरेषा तयार करण्यात आली. त्यानुसार पक्ष रोज केजरीवाल यांना पाच प्रश्न विचारणार आहे. तसेच यावेळी जाहीरनाम्याऐवजी व्हिजन डॉक्युमेंट आणणार असल्याचेही पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, भाजपच्या हल्ल्याने आपला मिळत आहे सहानुभुती