आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Delhi Election: Bjp Again Targeting Aam Aadmi Party With A New Advertisement

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलग चौथ्या जाहिरातीतून भाजपचा \'आप\'वर हल्ला, दिग्विजय यांनी केला केजरीवालांचा बचाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे (भाजप) 'आम आदमी पक्षाविरुद्ध (आप) 'जाहिरात वॉर' चौथ्या दिवशीही सुरुच आहे. भाजपद्वारा आज (मंगळवारी) प्रकाशित झालेल्या जाहिरातीतून 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल करण्‍यात आला आहे. केजरीवाल यांनी बनावट कंपन्यांकडून देणगी घेतल्याचा घणाघाती आरोप केला आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी 'आप'चा बचाव केला आहे.

'आप' फसवण्यात भाजपचे ‘डर्टी ट्रिक्स डिपार्टमेंट’चा हात असल्याचे दिग्विजय यांनी म्हटले आहे.

असा वाढला वाद...
'अवाम' या एनजीओने सोमवारी (2 फेब्रुवारी) 'आप'वर गंभीर आरोप केले होते. 'आप' बनावट कंपन्यांकडून 50-50 लाख रुपयांच्या देणग्या घेतल्या आहे. हे प्रकरण 'मनी लाँडरिंग'चे आहे. त्यामुळे भाजपला 'आप'वर टीका करण्याची आयतीच संधी मिळाली. बनावट कंपन्यांकडून 'आप'ने एकूण दोन कोटी रुपयांची देणगी घेतली आहे. 'आप'ला देणगी मिळालेल्या कंपन्या या दिल्लीतील 'स्लम' भागातील आहेत. भाजपने 'अवाम'च्या आरोपांचा आधार घेत केजरीवाल यांच्यावर टीका करणारी आणखी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

काय आहे चौथ्या जाहिरातीत...
भाजपच्या चौथ्या जाहिरातीत 'आप'वर घणाघाती टीका केली आहे. 'फर्जी कंपनियों से मैं काले धन का चंदा भी खाऊंखा और राजनीति में फर्जी स्वच्छता की पुंगी भी बजाऊंगा' असा हिंद‍ी भाषेत मजकूल आहे. सोबत एका मशिनमध्ये पोत्यातून काळा पैसा टाकताना काही लोकांना कार्टूनमधून दाखवण्यात आले आहे. दुसर्‍या बाजुला एक व्यक्तीने मफलर आणि टोपी परिधान केलेले दाखवण्यात आले आहे. त्याच्या हातात एक कटोरा दाखवण्यात आले आहे. कटोर्‍यावर चंदा (देणगी) असे ठळक अक्षरात लिहिले आहे. तसेच मशीनमधून चेक (धनादेश) बाहेर निघत आहे. तसेच मशीनच्या चिमणीतून प्रामाणिकपणाचा धूर निघत असल्याचे दिसत आहे.