आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपना दलच्या चिरफळ्या; मुलगी म्हणते पक्ष भाजपमध्ये विलिन, आईने केली मोठी घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर प्रदेशातील मिर्झापूरच्या खासदार असलेल्या अनुप्रिया पटेल यांची मोदी कॅबिनेटमध्ये राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. - Divya Marathi
उत्तर प्रदेशातील मिर्झापूरच्या खासदार असलेल्या अनुप्रिया पटेल यांची मोदी कॅबिनेटमध्ये राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे.
नवी दिल्ली/लखनऊ - मोदी सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच झाला आहे. त्यात उत्तर प्रदेशातील अपना दलच्या कोट्यातून अनुप्रिया पटेल यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. त्यानंतर त्यांनी त्यांचा पक्ष भारतीय जनता पक्षात विलिन केला आहे. तर, दुसरीकडे त्यांच्या मातोश्री कृष्णा पटेल यांनी अपना दल अजूनही एक स्वतंत्र पक्ष असल्याचे सांगत भाजपसोबतची युती तोडण्याची घोषणा केली आहे. भाजपने माय-लेकीत लावलेले हे भांडण आता उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत अधिक रंगतदार होण्याचे चिन्ह आहे.
काय आहे भाजपचे राजकारण
भारतीय जनता पक्षाकडे लोकसभेत विक्रमी बहुमत आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून छोट्या-छोट्या पक्षांना सोबत घेण्याचे धोरण त्यांनी अवलंबले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून उत्तर प्रदेशात 2017 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची जुळवाजुळव सुरु आहे. त्यातूनच स्वतःच्याच पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या अनुप्रिया पटेल यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. मात्र आता त्यांच्या आईनेच त्यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत.
शिवसेनेसोबतही असेच घडले
- शिवसेनेला यावेळीही केंद्रीय मंत्रिमंडळात मानाचे स्थान देण्यात आलेले नाही. याआधी शिवसेनेेेच्या कोट्यातील मंत्रीपदी सुरेश प्रभु यांची नियुक्ती करण्याची अटकळ भाजपने घातली होती. मात्र सेनेने त्याला विरोध केला. परंतू सेनेचा विरोध डावलून प्रभूंना मोदी कॅबिनेटमध्ये घेण्यात आले.
- महाराष्ट्रातील सुरेश प्रभुंना मोदींच्या महत्त्वाकांक्षी रेल्वे योजना पूर्ण करण्याची जबाबादारी देऊन रेल्वे खाते देण्यात आले आहे.

आठवलेंनी दाखवला स्वाभिमान
अनुप्रिया यांच्यासोबत महाराष्ट्रातून रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनाही राज्यमंत्रीपद मिळाले आहे. मात्र त्यांनी मंत्रीपद गेले तरी चालेल पण पक्ष भाजपमध्ये विलिन करणार नसल्याचे ठणाकावून सांगितले आहे. यातून त्यांचा स्वाभिमान दिसत असला तरी भाजपचे छोट्या पक्षांबद्दलचे धोरणही अधोरेखित होत आहे.

काय म्हणाले अपना दल
> अपना दल भाजपमध्ये विलिन झाला नसल्याचा दावा पक्षाच्या अध्यक्षा आणि अनुप्रिया पटेल यांच्या आई कृष्णा पटेल यांनी केला आहे.
> येत्या 21 ऑगस्ट रोजी वाराणसीमध्ये भव्य रॅली करुन पक्षाची आगामी भूमिका स्पष्ट केली जाणार आहे.
> अपना दलचे प्रवक्ते आर.बी.सिंह पटेल म्हणाले, की पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने भाजपसोबतची युती तोडण्याचा निर्णय घेतला आहे.
> अपना दलने युती तुटण्याचे खापर भाजपच्या माथी मारेल आहे. सिंह म्हणाले, भाजपने युती धर्म पाळलेला नाही.
> अपना दलने अनुप्रिया यांना पक्षातून काढून टाकल्यानंतरही भाजपने त्यांना मंत्रीपद दिले आहे. भाजपने अपना दलच्या निर्णयाकडे डोळेझाक करुन युती धर्म धुळीस मिळविला आहे.
पुढील स्लाइडमध्ये, कोणाचा आहे अपना दल
बातम्या आणखी आहेत...