आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP And Congress In Political War Over Utterakhand Disaster

उत्तराखंडवरुन भाजप-कॉंग्रेस आमने-सामने; स्‍वराज यांची टीका, माकन यांचा पलटवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - उत्तराखंडमधील भीषण पूरस्थितीवरुन भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेस पुन्‍हा आमनेसामने आले आहेत. दोन्‍ही पक्षांच्‍या ज्‍येष्‍ठ नेत्‍यांनी एमेकांवर आरोप-प्रत्‍यारोप केले. ट्विटरवर दिलेल्‍या या प्रतिक्रीयांना शाब्दिक युद्धाचेच स्‍वरुप प्राप्‍त झाले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेत्‍या सुषमा स्‍वराज यांनी सर्वप्रथम ट्विटरवरुन उत्तराखंड सरकारवर टीका केली. त्‍यांनी लिहीले, 'उत्तराखंड सरकार या भीषण संकटावेळी मदत करण्यात अपयशी ठरल्‍याचे मला अतिशय दुःख आहे. या अपयशानंतर हे सरकार बरखास्त केले पाहिजे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी जाहीरपणे व्‍हीआयपींना उत्तराखंडला दौरा करु नये, असे सांगितल्यामुळे मी तेथे गेले नाही. गृहमंत्र्यांसोबत 18 जूनला चर्चा झाली होती. या प्रलयाची तीव्रता कल्‍पनेपेक्षा भीषण आहे.' स्‍वराज यांनी प्रथमच जाहीरपणे उत्तराखंडचे मुख्‍यमंत्री विजय बहुगुणा यांच्‍यावर थेट