आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साबीर अलींचा भाजपमधील मुक्काम ठरला एका रात्रीचा, नकवींच्या नाराजीनंतर सदस्यत्व रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - साबीर अली यांचा भाजपमधील मुक्काम एका दिवसाचाच ठरला आहे. शुक्रवारी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि शनिवारी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी अली यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचे सांगितले आहे.
जनता दल (यू) मधून हकालपट्टी झाल्यानंतर अली यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मात्र, दहशतवादी भटकळसोबत त्यांचे संबंध असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी केला. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही कार्यकर्ते आणि लोकभावनेच्या विरोधात भाजप नेत्यांनी निर्णय घेऊ नये, असे खडसावल्यानंतर भाजपने त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.

प्रमोद मुतालिक यांच्यानंतर साबीर अली हे दुसरे व्यक्ती आहेत, ज्यांना भाजपमध्ये प्रथम प्रवेश दिला आणि काही वेळातच त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

पक्षांतर्गत बाबी चव्हाट्यावर मांडू नका
अली यांच्या प्रवेशावर नकवींनी ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली होती. त्यांनतर विरोधी पक्षांनीही भाजपवर हल्ला केला. त्यासोबतच राष्ट्रीय स्वंयसेवक संघानेही कान टोचले. या पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी, पक्षांतर्गत बाबीं पक्षाच्या मंचावरच मांडाव्या, असा सल्ला भाजप नेत्यांना दिल्या आहेत.
साबीर अली
वय - 43 वर्षे
रक्सौल, बिहार.
- 2005 मध्ये लोक जनशक्ती पक्षातून (एलजीपी) राजकारणाला सुरवात.
- एलजीपीने रा्ज्यसभेचे खासदर केले.
- 2011 मध्ये साबीर अली यांनी जनता दल (यू)मध्ये प्रवेश केला.
- त्यानंतर जेडीयूने त्यांना राज्यसभेवर निवडून पाठविले. पक्षाचा मुस्लिम चेहरा आणि प्रवक्ते ही त्यांची ओळख होती.
- साबीर अली यांची ओळख एका उद्योजकाची आहे. त्यांच्याबद्दल असे बोलले जाते की, ते नितीशकुमारांना फंडींग करीत होते.
- गेल्या आठवड्यात मोदींची स्तूती केल्यामुळे जनता दल (यू) मधून हकालपट्टी.
- 28 मार्च 2014 भारतीय जनता पक्षात प्रवेश.
- 29 मार्च 2014 भाजपने सदस्यत्व रद्द केले.