आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीशकुमार यांनी एकदा संघ शाखेत यावे : भाजप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकशाही वाचवण्यासाठी देश ‘संघ-मुक्त’ करावा, असे आवाहन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केले होते. भाजपने त्यावरून नितीशकुमार यांच्यावर टीका करतानाच नितीश यांनी संघाबाबतचा गैरसमज दूर करण्यासाठी किमान एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत उपस्थित राहावे, असा सल्ला रविवारी दिला.

भाजपच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पक्ष प्रवक्ता श्रीकांत शर्मा म्हणाले की, नितीशकुमार यांनी संघ-मुक्त भारताचे आवाहन केले आहे. पण त्यांनी याआधी संघाच्या लोकांसोबत दीर्घ काळ काम केले आहे. त्यांनी भाजपसोबतही युती केली होती. भाजपच्या सरकारमध्येही ते सहभागी होते. आता ते संघमुक्त भारताची भाषा बोलत आहेत. त्यापेक्षा त्यांनी संघ कसा आहे हे समजून घ्यावे. त्यासाठी संघाच्या शाखेला भेट देणे योग्य ठरेल. तेव्हाच त्यांना संघ समजेल आणि त्यांचा गैरसमजही दूर होईल.

शर्मा म्हणाले. आमच्या पक्षाला पराभूत करण्यासाठी संयुक्त आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण आम्ही त्याला घाबरत नाही. मोदी सरकार देशाच्या आणि गरिबांच्या विकासासाठी काम करत आहे. अशी आघाडी स्थापन करून ते या कामाला खीळ घालू शकणार नाहीत. नितीशकुमार यांची महत्त्वाकांक्षा सर्वांना माहीत आहे. त्यांना आता पंतप्रधान व्हायचे आहे. त्यामुळे त्यांना अशी आघाडी हवी आहे. आता अशा आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी यांच्याकडे असेल की ते फक्त त्या आघाडीचा एक भाग असतील हे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच स्पष्ट करावे.

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, नितीशकुमार हे एकेकाळी काँग्रेसला विरोध करत असत. आता तेच काँग्रेससोबत जाण्याची भाषा बोलत आहेत. आम्ही गरीब, कमकुवत वर्गांसाठी काम करत आहोत. हेच नितीशकुमार यांच्या पचनी पडत नाही. त्यामुळेच ते भाजपला विरोध करत आहेत. पण त्यांच्या वक्तव्याला आमचा आक्षेप नाही. ते त्यांचा हेतू साध्य करू शकणार नाहीत.
बातम्या आणखी आहेत...